टीम मंगळवेढा टाईम्स।
बसस्टँड जवळ असलेल्या एका किराणा दुकानात अवैधरीत्या दारू विक्री होत होती. त्याठिकाणी बार्शी उपविभागीय पोलिस कार्यालयातील पोलिस पथकांनी छापा टाकला. पोलिसांनी ५ हजार रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना २ एप्रिल रोजी दुपारनंतर घडली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल बाळकृष्ण मुठाळ यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. दुकानदार नरसिंग दत्तात्रय गायकवाड (वय ४४, रा.पाथरी ता. बार्शी) यांच्याविरुद्ध तक्रार दिली.
बार्शी डीवायएसपी नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. पेट्रोलिंग करताना पाथरी येथे बसस्थानकाजवळ असलेल्या यश किराणा दुकानात देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची महिती मिळाली.
फिर्यादी पोलिस बाळकृष्ण मुठाळ, व त्याचे सहकारी पोलिस अभिजित गाटे व पोलिस भांगे यांनी जाऊन छापा टाकताच त्यात देशी विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीस ठेवलेल्या मिळताच त्या जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज