टीम मंगळवेढा टाईम्स।
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा सल्लाया सरकारकडून वारंवार दिला जातोय. पॅन कार्डमध्ये कोणतेही बायोमेट्रिक नसतात, त्यामुळे ते आधारशी लिंक करा असं सांगितलं जातं, पण अजूनही अनेकांनी पॅन आधारशी लिंक केलेलं नाही.
आता टॅक्स भरणाऱ्यांना एक शेवटची मुदत देण्यात आली आहे, त्यानुसार लवकरात लवकर करदात्यांना आपले पॅन आधारशी लिंक करावे लागणार आहे.
पॅन कार्डधारकांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, त्यानुसार पॅन वापरणाऱ्यांनी कालमर्यादेत त्यांचं खातं आधारशी लिंक न केल्यास कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
आयकर विभागाने म्हटलंय की जर करदात्यांनी 31 मे 2024 पर्यंत त्यांचं पॅन आधारशी लिंक केलं तर टीडीएसच्या कपातीसाठी कोणतीही कारवाई केली जाणार नाही,
पण लिंक न केल्यास मात्र कारवाई केली जाईल. आयकर नियमांनुसार, पॅन बायोमेट्रिक आधारशी लिंक नसल्यास, लागू दराच्या दुप्पट दराने टीडीएस कापला जाईल.
करदात्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत की त्यांना टीडीएस/टीसीएसच्या ‘शॉर्ट डिडक्शन/कलेक्शन’ मध्ये डिफॉल्ट झाल्याच्या नोटिसा मिळत आहेत, असं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBTD) म्हटलं आहे.
तर बंद होऊ शकतं पॅन कार्ड
सीबीडीटीने म्हटलंय की 31 मार्च 2024 पर्यंत केलेल्या व्यवहारांसाठी आणि जिथे 31 मे किंवा त्यापूर्वी आधारशी लिंक केल्यामुळे पॅन सक्रिय झालेल्या प्रकरणांमध्ये 2024 मध्ये टॅक्स डिडक्ट करण्याचं बंधन राहणार नाही.
एकेएम ग्लोबल, पार्टनर टॅक्स संदीप सहगल म्हणाले की या सर्क्युलरमुळे ज्या प्रकरणात करदात्याचं पॅन आधारशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय असल्याचं आढळतं, त्या करदात्यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो.
हा आहे शेवटचा पर्याय
ज्या प्रकरणांमध्ये कपातीसाठी करदात्यांना अशा नोटिसा प्राप्त झाल्या आहेत, त्या करदात्यांना 31 मे पूर्वी आधार पॅनशी लिंक करण्याचा सल्ला दिला जातो, या तरतुदीमुळे ज्यांना कमी कर भरावा लागतो, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं सहगल म्हणाले.
पॅन कार्ड चालू आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये आणि करदात्यांना यासाठी कपात करणाऱ्या डिडक्टरवर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे सध्या जास्त दिलासा दिला जाऊ शकत होता, तिथे तो देण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज