मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रोजी दुपारी दोन वाजता सहा गावांच्या कोतवालपद नियुक्तीसाठी जात प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी समितीचे अध्यक्ष प्रांत अधिकारी अप्पासाहेब संमिदर, सचिव तहसीलदार मदन जाधव, सदस्य गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, सदस्य समाजकल्याण प्रतिनिधी रामचंद्र हेंबाडे आदींच्या उपस्थितीत कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
दरम्यान, सहावी इयत्तेत शिकणाऱ्या अथर्व काळे याच्या हस्ते सर्व उपस्थितांसमोर आरक्षण सोडतच्या चिठ्या काढण्यात आल्या.
यामध्ये कोतवाल पदासाठी गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : मरवडे (सर्वसाधारण), रड्डे (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), मुढवी-धर्मगाव (राखीव स्त्री), नंदेश्वर ( इतर मागास वर्ग), मंगळवेढा (भटक्या जमाती क), मारापूर – शेवाडी (अनुसूचित जमाती स्त्री) याप्रमाणे आरक्षण आहे.
मरवडेत रास्तारोको; कामू पाटील मारेकर्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी
निंबोणी (ता.मंगळवेढा) येथील कामू पाटील यांच्या खून प्रकरणातील मारेकर्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर – विजयपुर महामार्गावर मरवडे येथील शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
निंबोणी येथील कामू शामराव पाटील यांचा तब्बल सहा महिन्यापुर्वी येथील भिमराव राचप्पा पाटील यांच्या मकेच्या पिकात मृतदेह आढळला होता. तत्पुर्वी त्यांच्या पत्नीने मंगळवेढा पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.
परंतू 17 दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडला विशेष म्हणजे भटक्या कुत्र्यांनी कामू पाटील यांचा पाय तोंडात धरुन निंबोणी गावात आणला होता. त्यामुळे निंबोणी गावात खळबळ उडाली होती. कामू पाटील या मयताचे दोन हात आणि दोन पाय तोडलेले होते.
घटनास्थळी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी भेट दिली असता यावेळी स्वत: मयत कामू पाटील यांचा मृतदेह पाहिल्यानंतर मयत कामू पाटील यांचा मुलगा रविंद्र पाटील यांच्या समोर हा खून आहे अशी वस्तुस्थिती बोलून दाखविली होती. परंतू पोलीस स्टेशनला आज तब्बल जवळपास सहा महिने होत आले तरीही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
सदरचा गुन्हा दाखल करुन आरोपीस गजाआड करावे या मागणीसाठी पाटील कुटूंबिय सतत पोलीस उपविभागीय कार्यालय व पोलीस स्टेशन येथे हेलपाटे मारत होते. सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय पुनम गेट येथे दि. 2 जून 2023 रोजी बेमुदत आंदोलन सुरु केले होते.
उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सदर मयताबाबतचा तपास सुरु असून तपासात जे निष्पन्न होईल त्या प्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. हे आश्वासन देवून दीड महिन्यानंतरही तपास सुरु आहे असे वारंवार सांगितले जात होते.
सदर पाटील यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्या आरोपीवर गुन्हा दाखल करुन तात्काळ गजाआड करावे तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित माने व उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांची चौकशी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पीडित कुटुंबातील सदस्य, निंबोणी, मरवडे येथील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रभाकर देशमुख यांनी उपमख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अवर सचिव अमोल पाटणकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत घटनेची व आंदोलनाची माहिती दिली.
श्री. पाटणकर यांनी सदर प्रकरण गंभीर असून या घटनेबाबत पोलिस अधीक्षक यांच्याशी बोलणे झाले असून हा तपास एलसीबी कडे देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. येत्या सात दिवसात निंबोणी येथील खूनप्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास मुंबईत पावसाळी अधिवेशनस्थळी निदर्शने व आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकर्त्यांनी दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज