टीम मंगळवेढा टाईम्स ।
दारूचे व्यसन असल्याने व्यसमुक्ती केंद्रात उपचारास दाखल केल्यानंतर उपचारात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी सरकारतर्फे पोलिसांनी फिर्याद दिल्याने डॉक्टरासह चौघांविरुद्ध पाच महिन्यांनंतर मंगळवारी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्या आला आहे.
२ एप्रिल ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला होता. यात प्रवीण अमृत करंडे (वय २७, होमकर नगर, सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला होता.
डॉ. हर्षल थडसरे (वय ३६), अनिता हदीमनी (वय ३३, सिस्टर), आशिष जाधव (हेल्पर), संतोष हदीमनी (वय ४२, रुग्ण) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
या प्रकारामुळे मयत तरुणाच्या नातलगांनी निष्काळजीपणा उपचारामध्ये दाखवल्याने कारवाईसाठी आंदोलन छेडले होते. पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते.
याप्रकरणी पाच महिन्यांनंतर चौकशीनुसार पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार भा.दं. वि. ३०४ (अ), ३६६,३३७, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला.
फिर्यादीत म्हटले आहे की, मयत तरुण प्रवीण यास दारूचे व्यसन असल्याने त्याला मीरा हॉस्पिटल सर्व सुखी नगर व्यसन मुक्तीच्या उपचारासाठी २ ते ५ एप्रिल २४ दरम्यान दाखल केले होते.
मयत प्रवीण करंडे याच्यावर उपचार करताना, हलगर्जीपणा दाखवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज