टीम मंगळवेढा टाईम्स ।
नीट पेपरफुटीतील संशयित शिक्षक संजय जाधव याच्या अटकेचा अहवाल लातूर पोलिसांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.
शिक्षण विभागाने हा अहवाल प्रशासन विभागाकडे पाठविला त्या अहवालावरून प्रशासनाने शिक्षक जाधव यास निलंबित केले आहे.
शिक्षक जाधव यास लातूर पोलिसांनी केली अटक
सध्या देशासह राज्यात नीट पेपरफुटी प्रकरण गाजत आहे. त्याचे लोण सोलापूर जिल्ह्यात आले आहे. माढा तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जाधव यास लातूर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक शिक्षण विभागास बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अहवाल पाठविला.
त्या अहवालाची तपासणी गुरुवारी शिक्षण विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर तो अहवाल जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी शिक्षक जाधव यास निलंबित केले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई
जिल्हा परिषद शिक्षक जाधव याने पैशाच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना अवैध मदत करुन गैरप्रकार करुन फसवूणक केली. त्यामुळे त्या शिक्षकाला कलम 420/120 भारतीय दंड संहितेनुसार अटक करुन त्याच्या गुन्हा दाखल केला आहे.
ही माहिती लातूर पोलीसांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागास कळविली. त्यामुळे त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज