टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभा निवडणुकीसाठी उमेवदारी अर्ज दाखल करण्यासाठी आज दि.२९ ऑक्टोबर मंगळवारी शेवटचा दिवस आहे. सोमवारी ११ मतदारसंघातून ११८ जणांनी १५५ उमेदवारी अर्ज दाखल केले.
अनेकांनी पक्षाचे नाव नोंदवून अर्ज भरले असले तरी एबी फॉर्म सोबत नसल्याने आज शेवटच्या दिवशी एबी फॉर्म जोडणे आवश्यक आहे. अन्यथा ज्यांना एबी फॉर्म नाही ते अपक्ष म्हणून गणले जातील.
सर्वाधिक मंगळवेढा-पंढरपूर, मध्य आणि सांगोल्यातून उमेदवारी दाखल झाली आहे. रविवारच्या सुटीनंतर सोमवारी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आणि दाखल करण्यासाठीही गर्दी होती.
शहरातील शहर मध्य मतदार संघातून १३ जणांनी १८, शहर उत्तरमधून १० जणांनी १३ तर सोलापूर दक्षिणमधून ११ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. करमाळा आणि माढ्यातून महायुती, महाविकास आघाडीला सोमवारी रात्री उशिरा अधिकृत उमेदवार ठरला आहे.
पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरवण्यासाठी एबी फॉर्म महत्वाचा आहे. तो जोडला तरच उमेदवाराला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळते. आज मंगळवारी शेवटच्या दिवशी निर्धारित वेळेत हा फॉर्म उमेदवाराला जोडता येऊ शकतो.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज