टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रासाठी आज दिवस काहीसा आशादायक तर काहीसा चिंताजनक असा ठरला आहे. कारण आज राज्यात 779 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेल्याने आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 30 हजार 108 एवढा झाला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट झाली असून आज पुण्यात 57 रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पुणे शहरात एकाच दिवस आढळलेली ही रुग्णांची सर्वात कमी संख्या आहे.
एकीकडे, पुण्यातील रुग्णांमध्ये झालेली घट आणि बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे राज्याला दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे मात्र एक चिंता कायम ठेवणारी आकडेवारीही समोर आली आहे. कारण संपूर्ण राज्याचा विचार करता आज 2361 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही संख्या आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे.
पुण्यात आज काय आहे स्थिती?
– दिवसभरात 57 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 168 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात सहा करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– 174 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 46 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6529.
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-5098 आणि ससून 531 )
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2259.
– एकूण मृत्यू -320.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 3950.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 1597.
Large decline in coronary heart disease patients in Pune
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज