मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठा आरक्षणाच्यामागणीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आज आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान , या आंदोलना साठी 5 हजार लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र आंदोलना पूर्वीच मैदान हाउस फुल्ल झालं आहे. तर त्याहून कैक प ट मराठा आंदोलक हे वाटेत आहे. त्यामुळे आंदोलन सुरु होण्या पूर्वीच गर्दीची लाट आज मुंबई त उसळ ल्याचे चित्र आहे.
दरम्यान या गर्दीच्या नियोजनासाठी खास उपाय केला गेल्याचे समोर आलं आहे. राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवांची गर्दी लक्षात घेता सुरुवातीला 5 हजार लोक आतमध्ये येणार आहेत. त्यानंतर टप्प्या टप्प्याने लोकांना सोडण्यात येणार असून आळी पाळीने लोकां ना मैदानात सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलनस्थळ आझाद मैदानही हाऊसफुल्ल!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक आज पहाटेपासून मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी ठीकठिकाणी मनोज जरांगेचं भव्य स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत.
दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे आझाद मैदानही हाऊसफुल्ल झालंय. मनोज जरांगेंनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
फ्री वेवरून प्रवास टाळण्याच्या मुंबई वाहतूक पोलिसांकडून सूचना
दुसरीकडे, मराठाआंदोलनाचाफटकामुंबईच्या वाहतुकीलादेखीलबसलाआहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फ्री वेवरून प्रवास टाळण्याच्या मुंबई वाहतूक पोलिसांकडून सूचना देण्यातआल्याआहे. फ्री-वेवरून सध्या केवळ मराठा आंदोलनकर्त्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यातआलीआहे.
आज मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता त्यानुसार नियोजन करण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज