मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण गावातील लखन सुरेश साखरे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. आई-वडील नसताना विद्यार्थी त्याने हे यश मिळवले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आई वडील नसताना भाऊ व वहिनी यांनी लोकांच्या शेतात कामाला जाऊन लखन याला शाळा शिकवली
ज्यावेळेस लखन उन्हाळ्या सुट्टीमध्ये गावी येत होता तेव्हा तो सुद्धा रोजंदारीने कामाला जाऊन पैसे कमवत होता.
त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद जैन हरिजन वस्ती उचेठाण व माध्यमिक शिक्षण श्री विलासराव देशमुख विद्यालय दामाजी कारखाना येथे झाले.
उचेठाण गावामध्ये बातमी समजताच फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्याला त्याच्या अडीअडचणी मध्ये सर्व व्यायाम कट्टा ग्रुप तसेच अरविंद पाटील सर , दत्ता कोळी, समाधान मेटकरी मित्रपरिवार यांनी वेळोवेळी मदत केली.
या यशाबद्दल आ.समाधान आवताडे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन तानाजी खरात आदींनी अभिनंदन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज