टीम मंगळवेढा टाईम्स ।
नेतृत्व व प्रामाणिक पणाचा विरोधकांत अभाव असून समविचारी आघाडीतील एकाही उमेदवाराला साखर कारखानदारीतील काडीमात्र माहिती नसल्याचा दावा आ.समाधान आवताडे यांनी केला आहे.
ते आज संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ माचनुर येथील सिद्धेश्वर मंदिरात फोडण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, बापूराया चौगुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोमनाथ आवताडे, अॅड.बापूसाहेब मेटकरी, सुरेश भाकरे, गणेश गावकरे, राजेंद्र सुरवसे, राजीव बाबर, सचिन शिवशरण, विजयसिंह पाटील, युवराज शिंदे, विलास डोके, लाडीक डोके, गोपाळ पवार, आबासाहेब डोके, सुधाकर मासाळ, आण्णासाहेब पाटील, चंद्रकांत पडवळे, उद्योजक जनार्दन शिवशरण, युवराज कोळी आदीजन उपस्थित होते.
आ.समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे कारखाना व्यवस्थित चालवता आला. गेली सहा वर्षे कारखाना कोणत्याही अडथळ्या विना चालवता आला.
कारखाना खिळखळा करून ठेवला होता तो परत पूर्वत आणायला वेळ गेला. आमचे सर्व सभासद सुज्ञ आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत, विरोधी गटात प्रामाणिक पणा नाही.
वाईट विचारांना वाईट लोकांना कारखान्यापासून दूर ठेवले पाहिजे. कारखाना म्हणजे लुटायची खान आहे असा समज यांचा झाला आहे यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन आ. समाधान आवताडे यांनी केले आहे.
2016 पूर्वीच्या संचालकांनी कारखाना लुटला होता, आम्ही व्यवस्थित चालवला असून या नगरीत ज्याचे पाप भरते त्यांना त्यांची जागा जनता दाखवते.
कोणत्याच बँकेचा मी थकबाकीदार नाही
कारखाना आमच्या ताब्यात असताना 137 कोटी कर्ज होते. कारखाना काटकसरीने चालवून आतापर्यंत 65 कोटींचे कर्ज फेडले आहे. आता 72 कोटींचे कर्ज राहिले आहे.
आम्ही कोणत्याच बँकेचे कर्ज काढले नाही व मी स्वतः कोणत्याच बँकेचा थकबाकीदार नाही. बळीराजाचे दामोदर देशमुख यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
एफ.आर.पी पेक्षा जास्त दर देण्याचे काम
गेली चार वर्षे अत्यंत बिकटीचे दिवस साखर कारखान्यावर आले होते. एफ आर पी पेक्षा जास्त दर देण्याचे काम आम्ही केले आहे.
शेतकऱ्यांची ऊस बिले त्यांच्या खात्यात जमा
सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले त्यांच्या खात्यात जमा झाली आहेत. खोटी कागदपत्रे दाखवून विरोधक दिशाभूल करत आहेत.
शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे कारखाना व्यवस्थित चालवला. सभासदांना विमा रक्कम अदा केली. 10 रुपय किलोनी साखर देण्याचे काम केले. येणाऱ्या काही दिवसात सभासदांनी मागणी केल्या प्रमाणे बदल केला जाईल असेही ते म्हणाले.
जो कामगार येत नव्हता त्याचे हाल झाले
दामाजी कारखान्याचा कामगार अत्यंत हुशार आहे. कारखान्याचे हित ते ओळखत आहेत. जे कामगार कामावर येत नव्हते त्यांचेच हाल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगारांना दोन वेळा पगार वाढ दिली
गतवर्षात कामगारांना दोन वेळा पगारवाढ दिली आहे.
कारखान्याच्या डीसलरी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार
दामाजी कारखान्याच्या डिस्लरी प्रकल्पाचे काम येत्या 30 तारखेला सुरू होईल. एक दोन प्रमिन्शन येत्या दोन तीन दिवसांत मिळतील.
——
गेस्ट होऊसच्या मुद्द्यावरून विरोधकांना प्रा.येताळा भगत यांनी लगावला टोला
या आधीचे संचालक मंडळ कारखान्याचे सर्व सुविधांचा लाभ त्यांनी पुरेपूर घेतले आहे. गेस्ट होऊसवर जेवणावळी कशा चालायच्या याची माहिती त्यांनी दिली.
दामाजी प्रमाणे बिल निघाले पाहिजे
जिल्ह्यातील शेतकरी इतर कारखान्यात ऊस घालत आहेत पण दामाजी प्रमाणे बिल आम्हाला मिळाले पाहिजे असा हट्टास धरत आहेत.
पेपरमधून टीव टीव करणारे पळून गेले
कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचे काही विरोधक त्या मुद्द्यावरून टीव टीव करत होती. खरी आकडेवारी समोर आल्यानंतर ती लोक पळून गेल्याचे प्रा.येताळा भगत यांनी सांगितले.
तालुक्यातील तीन योजना टक्केवारीत खाऊन टाकल्या
मंगळवेढा तालुक्यातील पाणी पुरवठ्याच्या तीन योजना ह्या टक्केवारीतून बंद पडल्या असल्याचा आरोप भगत यांनी केला.
विरोधकांत ताळमेळ नाही
समविचारी आघाडीत ताळमेळ नसल्यामुळे कारखाना ते चालवू शकत नाहीत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज