टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रभरात लॅबोरोटोरी सेवा देणारे पॅथॉलॉजिस्ट तुलनात्मक दृष्टीने अत्यल्प आहेत या अनुषंगाने आरोग्यसेवा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने डीएमएलटी पदवी धारकांना क्लिनिकल लॅबरोटरी सेवा ठेवण्यासाठी लॅबोरटरी सेवा मेडिकल कौन्सिल कौन्सिल कायदा 2011, 19 जुलै 2012 ,व 2016 चा अधिनियम क्रमांक 6 तसेच 30 जानेवारी 2016 अन्वये 18 ऑक्टोबर 2017 पासून स्वतंत्रपणे पँरा वैद्यकीय परिषद अस्तित्वात आणले आहे या अधिनियमाखाली कलम 26 (1) अंतर्गत स्वतः स्पष्ट तरतूद केली आहे.
पँरामेडिकल कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र ज्याच्याकडे नसेल अशा स्वतंत्रपणे क्लिनिकल लॅब चालवणारा टेक्निशनवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 2011 च्या कायद्यानुसार अपराध व व सारथी मधील कलम 31, 32 ,33 व यातील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे.
जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील लॅब चालक रुग्णाच्या जीवाशी खेळत असून अशा बोगस लॅब चालकांवर कारवाई करावी असा सूर जनतेतून उठत आहे.
सध्या कोरोनाच्या महामारीत राज्यभर संकट असून अनेक रुग्णांना भरमसाठ लूट केली जात आहे व योग्य उपचार मिळत नसल्यामुळे मृत्यू होत आहे.
तरी राज्यात जिल्ह्यातील शहर व ग्रामीण मध्ये अशा अनेक बोगस लॅब चालक असून बरेच दिवसापासून गोरख धंदा चालला आहे त्यामुळे रुग्णांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र पँरा मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसेल तर लॅब चालकास व्यवसाय करता येत नाही तसा कायदा आमलात आला.
पी एम सी रजिस्ट्रेशन व महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद मध्ये समाविष्ट नसलेल्या मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदवी, पदविका नसताना अनेक जण राज्यात पॅथॉलॉजी क्लिनिकल, लॅबरोटरी चे व्यवसाय करत तालुक्यातील अनेकांच्या अवास्तव शुल्क आकारून रुग्णास त्रासास सोमोरे जावे लागत आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची व बोर्डाची शैक्षणिक पात्रता नसताना व्यवसाय उघडून बसले आहेत व रुग्णाच्या आरोग्याची खेळत आहे राज्यात महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद स्थापित झाले असून सदर परिषदेमध्ये योग्य शैक्षणिक अहर्ता धारकांची नोंदणी केली जाते.
सध्या महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद ,मुंबई कडे दोन वर्षात फक्त 2700 अर्ज नोंदणी साठी आले होते त्यातील 1500 सदस्यांची नोंदणी झाली असून कौन्सिल चे प्रमाणपत्र दिले गेले आहेत तर बाकीचे 1300 अर्ज त्रुटी अभावी पेंडिंग आहेत.शैक्षणिक पात्रताच नसल्यामुळे राज्यात अनेक लॅब चालकांनी परिषदकडे नोंदणी केली नाही.
परंतु जिल्हा ,शहर तालुके, परिसरात गल्ली बोळात कमी कालावधीत रुपये कमावण्यासाठी दुकान थाटून गोरख धंदा चालू केला आहे.परंतु राज्यभरात साधारण 60 ते 70 हजार बोगस लॅब असल्याचे सांगितले जात आहेत.
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमंडली असल्याने अनेक वैद्यकीय बोगस व्यवसाय फोफावलेने चित्र निर्माण झाले आहे जनतेला कोरोनाच्या संकटात भर पडली आहे परंतु अनेक जिल्ह्यात व तालुक्यात लॅब चालकांची शैक्षणिक पात्रता नसल्याने तसेच नोंदणी करून न घेता अनाधिकृत लॅबरोटरी चा व्यवसाय करीत आहेत तसेच अनेक वैद्यकीय व्यवसाय कमिशनपोटी कोरोना ची रॅपिड , आर टी पी सी आर टेस्ट आदी टेस्ट न करता अशा बोगस लॅबधारकास रुग्णाचे रक्त तपासणी साठी पाठवले जात आहेत व प्रोत्साहन देत आहेत त्यामुळे त्या रुग्णांना आर्थिक नुकसान व चुकीच्या उपचारांमुळे बळी पडावे लागत आहे.
जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी , तहसीलदार , आरोग्य विभाग , पोलीस प्रशासन , मुख्याधिकारी आदी पथकाने याची तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र पँरा वैद्यकीय परिषद कायदा 33 नुसार कारवाई करण्यात यावी.तसेच चालू असलेला लॅब चालकांचा गोरख धंदा बंद करून गुन्हा दाखल करावा असे जनतेतून बोलले जात आहे.
तरी प्रशासनाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा, तालुकानिहाय असल्याल्या लॅबचालकांची योग्य शैक्षणिक अहर्ता तसेच व्यवसाय करण्यासाठी लागणारे पॅरा मेडिकल कौंसिल चे प्रमाणपत्राची पडताळणी करून असलेल्या बोगस लॅब वर कायदेशीर कारवाई करावी असे मागणी होत आहे.
लॅब चालकांची अधिकृत व अनधिकृत कुठलेही दफ्तरी नोंद शासनाच्या आरोग्य विभागाकडे नाही. गेली 25 वर्षे राज्यात बोगस लॅब चा धंदा . चुकीच्या निदानाने रुग्णास ,नातेवाईक यांना मनस्ताप व पैशाची लूट ,कोरोनाच्या महामारीत राज्यभरात लॅब चालकांची दुप्पट संख्या अनेकांनी बोगस लॅब चालू केल्या.
पथॉलॉजीष्ठ च्या नावे असलेल्या अनेक हॉस्पिटल , डायग्नोस्टीक सेंटर मध्ये लॅब चालू लॅब चालक देतात अहवाल. कोरोनाच्या महागडया तपासणी मुळे बोगस लॅब तेजीत व आर्थिक फायदा. अनेक वैद्यकीय व्यवसाय व लॅब चालक यांच्यात चाचणीच्या ग्रेडनुसार टक्केवारी. राज्यात अनेक पँरामेडिकल शैक्षणिक संस्था बोगस अजूनही कारवाई नाही.
आरोग्य विभागास माहित असूनही बोगस लॅब संबधी आतापर्यंत कुठलेही मोठी कारवाई झाली नाही . तरुण बेरोजगार युवकांचा ज्यादा पैसा मिळवण्या आमीषपोटी बोगस लॅब कडे कल. (स्रोत : सकाळ)
योग्य शैक्षणिक अर्हताधारक लॅब चालकांनी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे नोंदणी केली असेल तर त्यास व्यवसाय करता येतो. तसा कायदा अमलात आला. परंतु जिल्ह्यात अनेक बोगस लॅबचालक असून कोरोनाच्या संकटात कमिशनपोटी जनतेची अमाप लूट होत आहे. तरी बोगस लॅबवर प्रशासनाने कारवाई करून गुन्हा दाखल करावा. – दावल इनामदार, सदस्य, महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषद, मंगळवेढा
कोरोनाच्या संकटात बोगस लॅब चालक रुग्णांचा जीवाशी खेळत असून अमाप पैशाची लूट करीत आहे अशा तक्रारी राज्यभरात आल्या असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवली असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी . ” —- धनंजय कुलकर्णी , अध्यक्ष ,महाराष्ट्र परावैद्यक परिषद ,मुंबई
“राज्यातील ज्या लॅबचालकांनी
पँरामेडीकल कौन्सिलकडे अद्यापही नोंदणी केली नाही अशा बोगस लॅब चालकांवर प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी “.
—- आण्णासाहेब करोले ,
अध्यक्ष ,अकॅलप संघटना
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज