टीम मंगळवेढा टाईम्स ।
कुरवंडे गावातील शर्मा व्हिला या बंगल्यात मध्यरात्रीनंतर साऊंड सिस्टिमवर मोठ्या आवाजात गाणी लावत महिलांसोबत अश्लिल हावभाव करत नृत्य करणार्या
10 जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 294,188, 34, म.पो.कायदा कलम 33(N),131 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस कर्मचारी मनोज मोरव यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून श्रेयश शर्मा (रा. मुंबई) लक्ष्मण दाभाडे, कैलाश पवार, गुरू पाटील (तिघेही राहणार लोणावळा),
शिवाजी रामचंद्र भोसले, अभिजीत मच्छिंद्र सोनलकर, धनाजी अर्जुन जगताप, संतोष नामदेव शिंदे, प्रविण चंद्रमोहन पैलवान, फिरोज जहांगीर तांबोळी (सर्व राहणार सांगोला जि सोलापुर) यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री 1 वाजता हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सदर बंगल्याला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे लायसन्स नसताना देखील तो भाड्याने देण्यात आला होता.
लोणावळा शहरात अनेक खाजगी बंगले व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असून ते बेकायदेशीरपणे भाड्याने दिले जात आहेत.
लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी पोलीस हवालदार जयराज पाटणकर पुढील तपास करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज