मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
चालू खरीप हंगामामध्ये प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित असून ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
ही ऐच्छिक योजना असून कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होता येईल. शिवाय कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी दिली.
अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित पिकांची सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी किंवा लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, राहील.
विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देय राहील. नुकसान झाल्यास तीन दिवसांच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनी, कृषी व महसूल विभागाला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
पीक विमा संरक्षण मिळवण्यासाठी विहित मुदतीपूर्वी www.pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल.
१ रुपयात मिळवा विमा
मुग, कापूस, उडीद, तूर, मका आणि कांदा या पिकांचा यात समावेश आहे. यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरावा लागेल. भुईमुगसाठी प्रतिहेक्टरी २९ हजार, ज्वारीस २५ हजार, बाजरीस २२ हजार, सोयाबीन ४५ हजार, मूग आणि उडीद २० हजार, तूर ३२ हजार, कापूस २३ हजार, मका ६ हजार तर कांद्याला ६५ हजारांचा पीक विमा मिळेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज