मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अकलूज पोलीस स्टेशनचे हद्दीत व्यापाऱ्यांना दमदाटी करून दादागिरी करून व्यापाऱ्याकडून जबरदस्तीने कपडे घेऊन जाणे वस्तू घेऊन जाणे पैशाची मागणी करणे हप्ते घेणे असे प्रकार काही गुंड लोक करत आहेत .
अशाच प्रकारे दिल्ली जीन्स व स्टायलिस्ट जीन्स , अकलूज या दुकानातून सचिन यादव शिंदे ( वय २४ , रा . आंबेडकर नगर , अकलूज ) , संजय विश्वनाथ क्षीरसागर ( वय ३२ , रा . आझाद चौक ) , शरद दिलीप खरे ( वय ३१ , रा . महादेवनगर ) , अण्णा ऊर्फ सूर्या शहाजी सोनवणे ( रा . अकलूज ) यांनी बऱ्याच वर्षापासून या दुकान मालकास दमदाटी करून महिन्याला दोन ड्रेस घेऊन जातात .
त्याप्रमाणे १५ ते १९ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी ४७०० रूपयाचा माल घेऊन गेले . सदरची तक्रार दुकान मालक यांनी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे केली . निंबाळकर यांनी तत्काळ तक्रार दाखल करून त्यांच्यावर खंडणी रॉबरी या सारखे गुन्हे दाखल करून वरील १ ते ३ यांना अटक करून पोलिसी खाक्या दाखवून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज