टीम मंगळवेढा टाइम्स ।
कसबा, चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसब्यात भाजपाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची थेट लढत आहे.
तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
कसब्यात पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतदानात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पहिल्या फेरीच्या मतमोजणीत धंगेकर यांनी ३ हजारांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर दुसऱ्या फेरीनंतर ही धंगेकर यांची मतांची आघाडी कमी झाली. तर तिसऱ्या फेरीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी ६०० मतांची आघाडी घेतली होती.
11 फेऱ्या अखेर रवींद्र धंगेकर यांना 41,118 तर हेमंत रासने यांना 37,955 यांना मते मिळाली आहेत.
काँग्रेसचे उमेदवार दंगेकर जवळपास साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपच्या बालेकिल्ल्यातच मतांचा पाऊस पडला आहे
तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी पोस्टल मतदानापासून आतापर्यंतच्या सर्व फेरीत आघाडी घेतली आहे.
10 व्या फेरी अखेर भाजपाच्या अश्विनी जगताप 32,286 मते, तर नाना काटे 25,832, राहुल कलाटे 10,702 मते मिळाली आहेत. अश्विनी जगताप चिंचवड मतदारसंघात आघाडीवर आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज