मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
पंढरपूर किंवा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी करीत असलेले विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पॅनलचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव झाला.
यावर प्रतिक्रिया देताना ‘जितने के लिए कभी कभी हारना पड़ता है..’, असे सूचक उद्गार काढत पाटील यांनी आगामी वाटचालीचे संकेत दिले.
बाजार समितीवर सुमारे २५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या परिचारक गटाशी श्री विठ्ठल परिवार हा पारंपारिक विरोधक म्हणून आजवर दोन हात करत आलेला आहे.
मात्र, यावेळच्या निवडणुकीत श्री विठ्ठल परिवारात अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील असे गट पडले आहेत.
सर्व गटांनी एकत्र येऊन बाजार समितीची निवडणूक लढवावी, यासाठी एक बैठकही झाली. मात्र, ती निष्फळ ठरली. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली पॅनल उभा करून लढत दिली. यात सर्व जागांवर त्यांचा पराभव झाला.
याविषयी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी वाटचाली विषयीही संकेत दिले.
पाटील म्हणाले, आजवर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहिलेल्या कर्मवीर कै.औदुंबर अण्णा पाटील, कै. वसंतराव काळे, कै.भारत भालके या नेतेमंडळींनी बाजार समितीसह तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये सक्षम विरोधकाची भूमिका निभावली.
आपणही तेच करीत आहोत. या निवडणुकीसाठी विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा मनापासून प्रयत्न केला.
मात्र, काहीतरी निमित्त करून काळे, भालके व इतर नेते हे सोबत आले नाहीत. तरीही आपण लढणे सोडले नाही. उमेदवार, मतदार, कार्यकर्त्यांना नाऊमेद न होऊ देता त्यांना बळ देण्याची जबाबदारी आपण पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज