टीम मंगळवेढा टाईम्स ।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा शहरातून 50 ईरटीका गाड्यांची सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बुरजे यांनी भगवी रॅली काढल्याने ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजराने मंगळवेढा शहर दुमदुमले होते.
ढोल, ताशे, नगाडे, आतीशबाजी, छत्रपती शिवरायांची आकर्षक झाँकी, अश्वारुढ मावळे, भगवे, तोरण, पताका, शिवसैनिकांच्या हातातील भगवे झेंडे, तरूण, तरुणीनी धारण केलेल्या भगवे फेटे यांनी सारा आसमंत भगवामय वाटत होता.
निघालेल्या भगव्या रॅलीत आबालवृद्धांसह युवक-युवतींनी लाडक्या शिवरायांच्या जन्मदिनाचा जल्लोष केला. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बुरजे मित्र परिवाराच्यावतीने भगव्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक रणजित माने, दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बुरजे समाधान फुगारे, पोलीस कर्मचारी सुनिल मोरे , पोपट मोरे, दावल इनामदार,उद्योजक अजीम मकानदार यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व रॅलीचा शुभारंभ करण्यात आला होता.
जय भवानी, जय शिवाजीच्या गजराने युवक-युवतींनी मंगळवेढा दुमदुमून सोडले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. मात्र छत्रपतींची जयंती फक्त दोनच दिवस नव्हे तर पूर्ण वर्षभर प्रत्येक घरामध्ये साजरी करण्यात यावी, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बुरजे यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज