टीम मंगळवेढा टाईम्स।
संत दामाजी नगर ग्रामपंचायत गावात गेल्या अनेक दिवसापासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे फेब्रुवारीपासून गावातील तसेच वाड्या – वस्त्यांवरील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून,
ग्रामपंचायतने महसूल व पाणीपुरवठा विभागाकडे महिन्यापूर्वी पाणी टँकरची मागणी करून देखील अद्याप टैंकर चालू न झाल्याने तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने पाणी टँकर तात्काळ चालू न केल्यास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा ग्रा.पं. सदस्य आण्णासाहेब विठोबा आसबे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संत दामाजी नगर ग्रामपंचायत गावामध्ये फेब्रुवारीपासून गावासह वाड्या – वस्त्यांवरील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावासाठी जल जीवन योजनेचे काम मंजूर आहे.
परंतु काही अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे सदरची योजना अर्धवट स्थितीत पडलेली आहे. त्यातच आमचे गाव हे न.पा. हद्दीलगत असून ग्रामपंचायत स्थापन होण्याअगोदर आमच्या गावाला न.पा. प्रशासन पाणीपुरवठा करत होते.
परंतु २०१३ साली २ नव्याने ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काही मुजोर अधिकारी व राजकीय पुढारी यांनी मिळून संत दामाजीनगर व संत चोखामेळानगर हद्दीतील नागरिकांकडून दुप्पट पाणीपट्टी वसूल करण्याचा व अन्याय करणारा ठराव केलेला आहे.
दुप्पट पाणीपट्टी वसूल करुनही आमच्या गावातील न.पा.चे नळ कनेक्शन असणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच जल जीवनच्या अधिकाऱ्यांकडूनही गेली ३ महिने झाले फक्त आश्वासने दिली जात आहेत.
अद्याप टाकीचे काम झाले नसल्यामुळे बायपास करून पाणी देऊ, असे आश्वासन देऊन प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा उपअभियंता व लोकप्रतिनिधींची फक्त दिशाभूल करीत आहेत.
पाणी टँकर मागणीचा प्रस्ताव देऊन अनेक दिवस उलटले तरी पाणी टँकर सुरु केला जात नाही. त्यामुळे संत दामाजी नगरमधील नागरिक पाण्यासाठी हवालदिल झालेले आहेत.
तरी आपण कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या नात्याने दुप्पट पाणीपट्टी वसूल करीत असलेल्या न.पा. प्रशासनास, नळ कनेक्शन असलेल्या लोकांना पुरेसे पाणी देण्याच्या
सूचना कराव्यात व दुजाभाव करून वसूल करीत असलेली पाणीपट्टी रद्द करण्याच्या सूचना कराव्यात व संत दामाजी नगरमधील तहानलेल्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकरची सुविधा तात्काळ सुरू करावी;
अन्यथा ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ मेपासून आपण व माझ्या गावातील नागरिकांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालय मंगळवेढा यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा आसबे यांनी दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज