टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने अनेकजण निवडणूक लढवणार असल्याचे समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. उमेदवारांचे प्रमाण वाढल्यास काय करावे? याबाबत निवडणूक आयोगास सोमवारी पत्र लिहून मार्गदर्शन मागवले आहे.
आयोगाकडून सूचना येतील त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने येथे अडचण येण्याचे शक्यता कमी आहे. पण माढा मतदारसंघ खुला असल्याने तसेच तेथे मराठा समाजास बहुसंख्य असल्याने तेथे अडचण येऊ शकेल असा अंदाज आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत एका मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा विचार समाजाने केला आहे.
सोलापूर विमानतळावरील धावपट्टी, संरक्षक भिंतीची कामे घेतला आढावा
सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी, संरक्षक भिंत, मुख्य प्रशासकीय इमारत, पार्किंग आदी कामे सुरू आहेत. त्याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी झाली.
तेथील कामे सुरू असून, ते अंतिम टप्यात असल्याची माहिती – विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी • दिली. उर्वरित कामे वेगाने पूर्ण • करण्याच्या सूचना सोलापूर विमानतळ प्राधिकरण समितीचे चेअरमन, खासदार डॉ. जयसिध्देश्वर स्वामी यांनी दिली. ते ऑनलाइन सहभागी झाले होते.
फेब्रुवारीअखेर कामे पूर्ण करण्याची सूचना होती. मात्र, कामे अद्याप सुरू आहेत. धावपट्टीचे दुसऱ्या थराचे काम संपवून तिसऱ्या थराचेही काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करा. मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व कामे चार-पाच आठवड्यात पूर्ण करण्याची सूचना खासदार डॉ. स्वामी यांनी केली.
यावेळी भारतीय विमानतळचे व्यवस्थापक, महापालिका, पोलिस प्रशासन आदी यंत्रणांचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज