मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता केवायसी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत. केवायसीची शेवटची तारीख दि.३१ डिसेंबर २०२५ आहे.

त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करायचे आहे. अजूनही लाखो महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.

जर लाडक्या बहिणींनी केवायसी केले नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाऊ शकतो. दरम्यान, केवायसीची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची केवायसी
लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवा. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केले आहे. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही प्रोसेस अनिवार्य केली आहे.

दरम्यान, आता ई केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.
ई केवायसी करताना अजूनही लाभार्थी महिलांना खूप अडचणी येत आहेत. सर्व्हर डाउन किंवा ओटीपी येत नसल्याने ही प्रोसेस होत नाही. त्यामुळेच आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची केवायसी करणार आहेत.

केवायसी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केली होती. तरीही महिलांना अडचणी येत आहेत. यासाठीच महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
चूक सुधारण्याची एकच संधी
ई केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. याचसोबत ई केवायसी प्रक्रियेत जर कोणतीही चूक झाली असेल तर त्यासाठी एक संधी मिळणार आहे.

तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही चूक सुधारु शकतात. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













