मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२ वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.
प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांचा शाळेमधील मुलींची यादी संबंधित आगारप्रमुखांकडे द्यावी. ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या ५० ते १०० पेक्षा अधिक असेल, त्याठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन जागेवरच पास देतील.
यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात गुरुवारपासून झाली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे.
पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो. बारावीनंतरच्या मुलींना एक तृतीयांश रक्कम भरल्यावर शैक्षणिक सवलतीचा पास दिला जातो.
पूर्वीसारखे आता प्रत्येक मुलींना पास काढण्यासाठी आगारासमोरील रांगेत उभारण्याची किंवा हेलपाटे मारण्याची गरज नाही. आगारातील अधिकारी मोठ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांच्या मागणी अर्जावरून शाळेतच पास देतील, अशी सोय करण्यात आली आहे.
त्यासाठी केवळ त्या मुलीचे बोनाफाईड लागणार आहे. मुलींना तीन-तीन महिन्यांचे पास दिले जातात. एकदा पास काढला की पुन्हा तीन महिन्यानंतरच पास मिळतो. त्यावेळी देखील मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे.
ज्या शाळेत मुलगी शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून बोनाफाईड घेऊन एक अर्ज केल्यानंतर एसटी महामंडळाकडून (संबंधित आगारातून) १०० टक्के मोफत प्रवासाचा पास दिला जातो.
हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था असून कोणी अधिकारी टाळाटाळ करीत असल्यास थेट आपल्याशी संपर्क (मो. नं. ९०२१८९३७०४) साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक श्री. भालेराव यांनी केले आहे.
शाळेचा मुख्याध्यापक त्यांच्या एखाद्या शिक्षकाच्या माध्यमातून सर्व मुलींची यादी आगार प्रमुखांना सादर करेल. त्यांची शैक्षणिक कागदपत्रे पाहून त्या सर्वच मुलींना एसटीच्या मोफत प्रवासाचे पास दिले जातील.
मुलींना किंवा त्यांच्या पालकांना एसटीच्या आगारात जाण्याची आता आवश्यकता नाही. दरम्यान, मोफत किंवा सवलतीचे पास देण्यासाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र व्यवस्था असून सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत त्याठिकाणी पास काढता येतील, अशी माहिती विभाग नियंत्रक श्री. भालेराव यांनी यावेळी सांगितले.(स्रोत:सकाळ)
इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत प्रवासाचे पास एसटी महामंडळाकडून मिळतात. त्यासाठी त्यांना आता विभाग किंवा आगारात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मुख्याध्यापकांनी पाठविलेल्या यादीनुसार सर्व मुलींना पास दिले जातील.
मोठ्या शाळांमध्ये आमचे अधिकारी जाऊन त्याठिकाणी पास देतील, अशी व्यवस्था केली आहे. – विनोद भालेराव, विभाग नियंत्रक, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज