टीम मंगळवेढा टाईम्स ।
हिंदू धर्मियांसाठी चैत्र महिना हा फार खास असतो. चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाच्या प्रतिपदेला दक्षिण भारतात युगादी साजरा केला जातो तर महाराष्ट्र आणि गोव्यात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो.
कर्नाटकाच्या काही भागांमध्ये आणि आंध्र प्रदेशातही याला युगादी म्हटले जाते. केरळमध्ये संवत्सर पडवो, काश्मीरमध्ये नवरेह, मणीपूरमध्ये ‘सजिबु नोंगमा पानबा’ नावाने हा सण साजरा केला जातो.
असे मानले जाते की चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते ज्यात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा होते.
सणाशी संबंधित इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या
पौराणिक ग्रथांनुसार पहिल्या युगाच्या रूपात सत्ययुगाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी झाला होता.
महाराष्ट्रात नववर्षारंभ म्हणून हा सण साजरा केला जातो.
शेतकरी या दिवशी नव्या पिकाची पूजा करतात. महान गणितज्ञ भास्कराचार्यांच्या म्हणण्यानुसार चैत्र प्रतिपदेलाच दिवस, महिने आणि वर्ष या गणणेला प्रारंभ झाला.
चैत्रातील शुक्लपक्षाच्या प्रतिपदेलाच रामाने रावणाचा वध करून दक्षिण भारताला मुक्ती दिली होती, ज्यामुळे महाराष्ट्रात गुढी उभारली जाते.
यादिवशी महाराष्ट्र आणि गोव्यात लोक आपापल्या घरांची साफसफाई केल्यानंतर घरांच्या बाहेर रांगोळ्या काढतात. तोरण बांधतात आणि गुढी उभारतात.
विशेष पक्वान्न म्हणून पुरणपोळी बनवून घरी आलेल्या पाहुण्यांना दिली जाते.
घरात पूजा करून पुढी उभारल्याने घरात नकारात्मक किंवा वाईट शक्ती येत नाहीत आणि घरात, कुटुंबात सुख आणि आनंद येतो अशी लोकांची श्रद्धा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सेनेचा पराभव केल्यानंतर गुढीपाडवा पहिल्यांदा साजरा केला होता.
यादिवशी महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात कडुलिंबाची पाने खाल्ली जातात जी आरोग्यासाठी चांगली असतात.
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा सण युगादी, छेती चांद अशा विविध नावांनी स्थानिक परंपरांनुसार साजरा केला जातो.
यादिवशी सोने, विद्युत उपकरणे, मालमत्ता, वाहने खरेदी करणे शुभ मानले जाते.
आज गुढीपाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व.
गुढीपाडव्याचे महत्त्व
पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.
गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त
गुढीपाडव्याचा उत्सव – 2 एप्रिल 2022
प्रतिपदा तिथीची सुरुवात – 2 एप्रिल 2021 ला 06:09am
गुढी पाडव्याची पूजा पद्धत
1. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे.
त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं.
यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी सजावलं जाते.
नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात.
गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा केली जाते.
गुढीपाडवा पूजा सामग्री
तांब्याचा कलश, नवीन कपडा, आंब्याची पानं, कडुलिंबाच्या पानांचा गुच्छा, साखरेची गाठी, फुलांचा हार, लाकडी काठी, तांदुळ आणि हळद, कुंकू, पान आणि सुपारी, नारळ, फळं, उदबत्ती, दिवा
गुढी कशी उभारावी –
गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात.
काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते.
ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.
त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.
तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावावी.
गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.
निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी.
दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवावं.
दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवावी.
सूचना- या लेखात दिलेली सर्व माहिती ही प्रचलित मान्यतांच्या आधारे दिलेली आहे. याची सत्यता, अचूकता आणि विशिष्ट परिणामांची खात्री देता येत नाही. प्रत्येकाने आपल्या विवेकाने याकडे पाहावे.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज