पंढरपूर : राजेंद्र फुगारे
उजनी उजवा कालवा तसेच वसाहत या साठी भूसंपादित शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 30 नोव्हेंबर पूर्वी काढण्याचे आवाहन पाटबंधारे विभागा मार्फत करण्यात आले होते.

परंतु काही ठिकाणी अद्याप अतिक्रमणे काढली नसल्याचे निदर्शनास आले आहे तरी उजनी उजवा कालवा व वसाहती साठी संपादित केलेल्या जमिनीवरील

कृषी वाणिज्य रहिवासी व इतर अतिक्रमणे पुढील आठ दिवसात काढण्याचे आवाहन मा कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी केलेले आहे.

कडाक्याच्या थंडीत वारी परिवाराचा मायेचा हात; 200 गरजूंना ब्लँकेटची ऊब!
मंगळवेढा शहरात सध्या कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले आहेत अशा परिस्थितीत रस्त्यावर,झोपडीमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या 200 गरजुंना वारी परिवाराने ब्लॅंकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली.

सद्या थंडीचा जोर वाढला असून या थंडीने सर्वसामान्य नागरिक कुडकुडला आहे तर अनेकांनी सध्या शेकोटीचा आधार देखील घेतला आहे.
अशा परिस्थितीत रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना पोटाची उपजीविका करण्यासाठी थंडीत देखील घराबाहेर पडावे लागत आहे वारी परिवाराने मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना सामाजिक बांधिलकी जोपासली आहे

सामाजिक जाणीवेतून रस्त्यालगत, मंदिराशेजारी,निराधार,झोपडपट्टी व गरजुंना ब्लँकेट वाटप करण्यात आले या उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात आला. उपक्रमासाठी राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी सिद्धेश्वर शिंदे,उमेश माने,प्रफुल्ल सोमदळे,दत्तात्रय भोसले,सुनिल लेंडवे,आदेश मोरे,किरण मोरे, विठ्ठल बिले,रतिलाल दत्तू,गणेश मोरे,पार्थ भगरे,प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू उपस्थित होते.
“सेवाच खरा धर्म” या भावनेतून वारी परिवार वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो. कडाक्याची थंडी लक्षात घेता गोरगरिबांना ब्लॅकेट वाटण्याचा निर्णय घेतला ब्लॅंकेट मिळाल्यावर थंडीमुळे त्रस्त असलेल्या अनेक गरजू नागरिकांच्या व मुलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.सतीश दत्तू, अध्यक्ष, वारी परीवार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












