तानाजी गोरड । अमेरिकेच्या बगदादमधील ३ जानेवारी २०१९ रोजी ड्रोन हल्ल्यामुळे इराणचे जनरल कमांडर कासिम सुलेमानी यांची मृत्यू झाला होता. याच प्रकरणाबाबत इराणने एक मोठं पाऊल उचललं आहे. इराणने ( US President Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. शिवाय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह इतर अमेरिकन अधिकाऱ्यांवर वॉरंट काढलं आहे. Iran issues arrest warrant against Donald Trump
इराणची वृत्तसंस्था आयएसएनएच्या वृत्तानुसार, तेहरानचे वकील अली अलकसिमेर यांनी सोमवारी सांगितले की, ट्रम्प आणि ३० हून अधिक अधिकाऱ्यांवर कासिम सुलेमानी यांच्यावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप इराण सरकारचा आहे. ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ संपला तरीही इराण सरकार दोषींना शिक्षा देणार, असं ट्रम्प याचं नाव न घेतला अलकसिमेर यांनी सांगितलं.
अलकसिमेर पुढे म्हणाले की, ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इराण सरकारने रेड नोटीस काढण्याची विनंती केली आहे. इंटरपोलने उच्चस्तरीय लोकांच्या अटकेसाठी रेड नोटीस बजावली आहे.
अद्याप इराणच्या या निवेदनावर फ्रान्समधील लिओन येथील इंटरपोल एजन्सीने कोणताही प्रतिसाद दिला आहे. इंटरपोल राजकीय कृतीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत सहभागी होऊ शकत आहे, असा नियम इंटरपोलचा आहे. तसेच लवकरच याबाबत इंटरपोल अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने ३ जानेवारी रोजी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात रिवोल्यूशनरी गार्डचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केलं. अमेरिकेने म्हटलं होतं की, कासिम सुलेमानी अमेरिकन लोकांविरुद्ध हल्ल्याच्या कटात सहभागी होते. त्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकन सैनिकांच्या ठिकाणावरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या एकाही सैनिकाला इजा झाली नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज