टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व रविवारपासून पुन्हा सुरु झाले आहे.
पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात आली.
चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ऋतुराजने एकाकी झुंज देत 156 धावांपर्यंत मजल मारली.
त्यानंतर मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही.
सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज