mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

IPL2020 : आयपीएलची ‘लस’ आजपासून; आठ संघ,53 दिवस आणि 60 सामन्यांची मेजवानी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
IPL2020 : आयपीएलची ‘लस’ आजपासून; आठ संघ,53 दिवस आणि 60 सामन्यांची मेजवानी

 


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । आजपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स व महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात मुंबईला वेगवान गोलंदाज लसित मलिंगाची तर, चेन्नईला सुरेश रैनाची उणीव भासणार आहे.  IPL’s ‘vaccine’ from today;  A feast of eight teams, 53 days and 60 matches

मात्र, याहीपेक्षा मोठे आव्हान असेल ते उष्ण वातावरण व येथील मैदानावरच्या नव्या कोऱ्या खेळपट्टीचे.  IPL opening match between Mumbai Indians and Chennai Super Kings will be played today

मॅचफिक्‍सिंगच्या प्रकरणानंतर भारतीय संघ आखातात मुळातच गेल्या 10 वर्षांपेक्षाही जास्त काळ खेळलेला नाही. त्यामुळे परदेशी खेळाडूंप्रमाणे भारतीय खेळाडूंनाही येथील खेळपट्टीचा अभ्यासच करता आलेला नाही. दोन्ही संघांनाही याचा फायदा-तोटा समानच होणार आहे.


अर्थात, रोहित शर्मा व धोनी यांच्यासारख्या खेळाडूंना स्थिरावण्यास वेळ लागत नाही.मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा यंदा करोनाच्या धोक्‍यामुळे लांबणीवर टाकली गेली व आता आखातात हा धोका कमी असल्याने सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत सुरू होत आहे. 

या स्पर्धेसाठी सर्व संघांचे खेळाडू येथे दाखल झाल्यावर सुरुवातीला काही दिवस विलगीकरणात राहिले व त्यानंतर त्यांचा सराव सुरू झाला.

चेन्नई संघातील दीपक चहर व ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य मिळून एकूण 13 जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातून ऋतुराज वगळता सर्व जण करोनातून मुक्‍त झाले. त्यानंतर चेन्नई संघाचा सरावही सुरू झाला. त्यात धोनीसह सर्व खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असल्याने मुंबईसमोर त्यांची फलंदाजी कशी रोखायची याचेच आव्हान राहणार आहे.


मुंबईचा स्टार गोलंदाज लसित मलिंगा याची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे. तोच त्यांच्याकडून या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. अर्थात, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, नाथन कुल्टरनाइल व अष्टपैलू कॅरन पोलार्ड यांच्याकडून सरस कामगिरीची अपेक्षा आहे.

कॅरेबियन लीगमध्ये पोलार्डने सातत्यपूर्ण खेळ केल्याने त्याला कसे रोखायचे हा चेन्नईसमोरचा मोठा प्रश्‍न राहणार आहे.

सामन्याची वेळ

सायंकाळी : 7ः30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार) , ठिकाण : आबूधाबी, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टसवर.

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

सामना आबूधाबीत आहे. त्यातच येथे सध्या खूप उष्ण वातावरण आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दवाचा फरक पडणार आहे. 

त्यामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रीप करताना त्रास होणार असल्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता जास्त आहे.

धोनीचा खेळ पाहण्यासाठी करोडो चाहते आतुर


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी मैदानाबाहेर तुफान गर्दी होत आहे. ही स्पर्धा पार पडल्यानंतर धोनी थेट पुढील वर्षीच आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार असल्याने त्याचा खेळ पाहण्यासाठी करोडो चाहते थेट प्रक्षेपणाची आतूरतेने वाट पाहात आहेत.

प्रेक्षकांना मैदानात मनाई

करोनाचा धोका जगभरात अद्याप कायम असल्याने या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात येणार नाही. अर्थात, स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात कोरोनाचा धोका संपुष्टात आला तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मत बीसीसीआय, अमिराती क्रिकेट मंडळ व अमिराती सरकारने व्यक्‍त केले आहे.

IPL opening match between Mumbai Indians and Chennai Super Kings will be played today

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshKrida

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
आरोपीला जेलमध्ये टाकून जाणिवपूर्वक त्रास दिल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी निलंबित

आरोपीला जेलमध्ये टाकून जाणिवपूर्वक त्रास दिल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा