मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राज्य शासनाने पायी येणाऱ्या भाविकांसाठी तर पंढरपूर मंदिर समितीने पंढरपूर परिसरातील वारकऱ्यांसाठी विमा उतरवला आहे. हा विमा तीन दिवसांसाठी असणार वारकऱ्यांसाठीच्या विम्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास त्याचा वारकऱ्यांना लाभ मिळू शकतो.
मागील वारीत मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची संख्या मोठी असताना २०२२ मध्ये केवळ ६ वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाखांची मदत मिळाली आहे.
वारी कालावधीत पंढरपूर शहरात १० लाखांहून अधिक वारकऱ्यांची उपस्थिती असते. शहरातील नदीपात्र, महाद्वार, प्रदक्षिणा मार्ग, वाखरी, इसबावी याठिकाणी भाविकांचा महापूर असतो.
या भागात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. मागील वर्षी भीमा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेले १५ हून अधिक भाविक बुडाले होते. यापैकी १२ जणांना वाचविण्यात यश आले तर ३ भाविकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय गर्दीमध्ये भाविक जखमी झाले होते.
मंदिर समितीकडून चारही वारी काळात येणाऱ्या भाविकांसाठी विमा काढला आहे. या विम्यापोटी अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख, दोन अवयच निकामी १ लाख, एक अवयव निकामी ५० हजार तर जखमी झाल्यास रुग्णालयाचा खर्च २५ हजार रुपये देण्यात येतो.
२०२२ मध्ये ६ वारकऱ्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत दिली आहे. जखमी वारकऱ्यांना मदत दिल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
यंदा पंढरपूर शहरातील वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी शहराच्या गर्दी परिसरात १८ हून अधिक अॅम्ब्युलन्स व २० हून अधिक डॉक्टरांची पथके तैनात केली आहेत. अनुचित घटना घडल्यास वारकऱ्यांवर १० मिनिटांत उपचार मिळावा, असे नियोजन करण्यात आले आहे.
१८ पैकी १० अॅम्ब्युलन्स गर्दीच्या परिसरात थांबविण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांना कमी वेळेत उपचार करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेस दिल्याचे अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी सांगितले. यंदा वारी काळात आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज