टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिका कामकाजात मनमानीपणे वागून नगरपालिकेचे आर्थिक नुकसान करून अनियमितता व भ्रष्टाचार करणाऱ्या मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्या कारभाराची चौकशी
करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव हे रुजू झाल्यापासून वादग्रस्त व बेकायदेशीर कामकाज, भ्रष्टाचार करतात.
त्यांच्या बऱ्याचशा कार्यालयीन कामकाजात बेकायदेशीर बाबी, निष्काळजीपणा व भ्रष्टाचार करण्याच्या पध्दतीमुळे नगरपरिषदेचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
ते त्यांच्या पगारातून कपात करुन नगरपरिषदेच्या खात्यावर वर्ग करावे, सांस्कृतिक हॉलचे काम, नगरपरिषदेच्या निधीतून केलेल्या बऱ्याच कामांना स्थायी सभा,
सर्वसाधारण सभा व विविध समित्या या कोणत्याच सभागृहातील विषय घेऊन मंजुरी घेतली नाही, सीएफसी निविदा गेली दोन वर्षे काढली नाही, निकृष्ट रस्ते कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
त्यामुळे त्यांची चौकशी होऊन विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे कार्यालयीन अहवाल सादर करुन त्यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी या निवेदनामध्ये केली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त पुणे , उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा यांना पाठविल्या आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज