टीम मंगळवेढा टाईम्स।
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून लागल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या निंबोणी येथील दशरथ पांगरापा म्हारणूर या ७५ वर्षीय शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. निंबोणीत पाऊस व वादळी घरावरचे पत्रे उडून गेलेने त्यात ते जखमी झाले होते.
मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान ते मयत झाले आहेत. अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे तालुक्यातील ४२ गावातील ६७ शेतकऱ्यांचे ३७.३० हेक्टर क्षेत्रावरील फळबाग व इतर शेताचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील शेती, शेडनेट, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिक ही जखमी झाले आहेत. तालुक्यातील आठ मंडळांतील ५७७ घरांची पडझड झाली असून, ३ घरे पूर्णत पडली आहेत.
मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक जास्त शेडनेटचे नुकसान पाठखळ येथे झाले असून, शेतकऱ्यांनी बँकांची कर्ज काढून उभी केलेली ७ शेडनेट उडून पूर्णतः उडून गेली आहेत.
तालुक्यात एकूण ९ शेडनेटचे नुकसान झाले आहे. आंधळगावमधील ७ शेततळ्यांचे नुकसान झाले आहे.
मंगळवेढा शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या ४ हजार कडब्याच्या पेंड्या वाऱ्याने उडून गेल्या. पाटखळ आणि भोसे येथील दोन दुधाळ जनावरे वीज पडून ठार झाली. रविवारी पावसामुळे सहा जण गंभीर जखमी झाले.
आमदार आवताडे व प्रशांत परिचारक यांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापूर, अकोला, हाजापूर, पाटखळ या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी केली.
मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्या मुळे शेतीचे फार नुकसान झाले तसेच घरावरील, शाळेवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत आज प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानाची पाहणी केली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानाचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार आवताडे यांनी धीर देत, प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आमदार आवताडे म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज