मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गेल्याच आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांचं मोठं नुकसान झालं आहे. उंचच उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्याचं दिसून आलं.
या दुर्घटनेत मोठी वित्तहानी व जीवितहानी झाली होती, हजारांपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेचे व्हिडिओ देखील मनाला चटका देणारे आहेत.

दरम्यान, राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे, सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरलली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. साधारणपणे आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही.

मात्र, भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम माी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात भूकंपाचे केंद्रस्थान आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असतात. येथील कोयना परिसरात भूकंपाचे केंद्र असते, सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी येथील परिसर काहीसा हादरुन जातो.

मात्र, या भूकंपामुळे लातूर भूकंरपाच्या आठवणी ताज्या होतात. सोलापूर जिल्ह्यातील आजच्या भूकंपानंतरही काहींनी लातूरमधील भूकंपाच्या आठवणी ताज्या केल्याचं दिसून आलं.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









