टीम मंगळवेढा टाईम्स।
एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे महावितरणने वीजदरवाढ करत सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. सरासरी साडेसात टक्क्यांनी वीजदरवाढ झाली आहे.
यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर सुमारे 10 टक्के दरवाढ होण्याचा अंदाज आहे. नवे दर 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे या महिन्यापासून वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगानं गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आकर्षक आश्वासनं दिली जात आहे. एकीकडे भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपला लक्ष्य गाठण्यापासून रोखण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडणुकींच्या तोंडावर विद्यमान सरकारकडून मोठमोठ्या घोषणांची अपेक्षा असतानाच जनतेच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. महाराष्ट्राच्या महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं नवे वीज दर निश्चित केले आहेत.
जे नवे दर समोर आले आहेत, त्यात पूर्वीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, या वाढीमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांवर परिणाम होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
प्रति युनिट किती रुपयांची वाढ?
निवडणुकीच्या वातावरणात महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं (MERC) 1 एप्रिल 2024 पासून विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ केली आहे. एमईआरसीनं जारी केलेल्या नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत, ज्यात पूर्वी नागरिकांना 0 ते 100 युनिटसाठी 5.58 रुपये प्रति युनिट दरानं बिल भरावं लागत होतं,
आता त्यांना प्रति युनिट 5.88 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच, आता ग्राहकांना तुम्ही प्रति युनिट 30 पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.
दरवाढीमुळे सर्वसामान्यांना कितीचा फटका बसणार?
नव्या दरवाढीनुसार, 101 ते 300 युनिटसाठी 11 रुपये 46 पैसे मोजावे लागतील. तर, 301 ते 500 युनिटसाठी 15 रुपये 72 पैसे आणि 500 च्या वर युनिटसाठी 17 रुपये 81 पैसे मोजावे लागतील. नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत, यापूर्वी नागरिकांना जिथे 0 ते 100 युनिटसाठी प्रति युनिट 5.58 रुपये मोजावे लागत होते, त्याऐवजी आता त्यांना प्रति युनिट 5.88 रुपये मोजावे लागतील.
म्हणजेच, आता ग्राहकांना प्रति युनिट 30 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. तर 101 ते 300 युनिटसाठी ग्राहकांना 11 रुपये 46 पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय 301 ते 500 युनिटवर 15 रुपये 72 पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच, 500 युनिटपेक्षा जास्त वीज वापरासाठी ग्राहकांना प्रति युनिट 17.81 रुपये मोजावे लागतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज