मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बेभरवशाची शेती आणि विरळ होत चाललेल्या नोकरीच्या संधी यामुळे सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र हतबल न होता उद्योग , व्यवसाच्या वाटा शोधून मरवडे गावातील युवकांनी गावची बाजारपेठ अधिक समृद्ध केली आहे. असे उद्योगशिल युवक गावाचे आणि राष्ट्राचे वैभव आहेत असे गौरवोद्गार गटविकास अधिकारी डाॅ. संताजी पाटील यांनी काढले.
मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टीव्हल निमित्त मरवडे गावातील उद्योगशिल युवकांचा गौरव सोहळा संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी बोलताना डाॅ. पाटील यांनी जिद्द, चिकाटी, मेहनती वृत्ती या बळावर बेरोजगारीवर मात करता येते हे लक्षात घेऊन युवकांनी उद्योग व्यवसायामध्ये कर्तृत्व सिद्ध केले आहे. अशा उद्योगशिल युवकांचा गौरव करुन छत्रपती परिवाराने अन्य सुशिक्षित बेरोजगार युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. यावेळी व्यासपीठावर आदर्श ग्राम पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील, मरवडे भूषण साहेबराव पवार, सुभाषभाई मरवडेकर , शिरनांदगीचे सरपंच गुलाबराव थोरबोले, सरपंच महादेव मासाळ, मुंढेवाडीचे सरपंच शिवाजी पाटील, संजय पाटील इ मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. राजेंद्र जाधव हे होते.
यावेळी छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी प्रास्ताविकातून मरवडे गावच्या विविध क्षेत्रातील घौडदौडीला उद्योग.व्यापारामुळे बळ मिळाल्याचे सांगताना गौरवमूर्ती युवकांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी परेशभाई मरवडेकर, अजितसिंह पवार, बजरंग कोळी, हिरालाल माने, सागर चौधरी, प्रकाश सुर्यवंशी, वामन शिंदे , गणेश पाटील, तात्या पवार, गिरीधर शिवशरण, अशोक जाधव, विशाल घुले, कुंडलिक गणपाटील, अभिजीत बने, राजू भंडगे , दिलिप सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह , मानाचा फेटा, पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी, प्रविण गुंड यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत छत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी केले. शेवटी आभार अरुण सरडे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज