टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी२० मालिकेने होत आहे. यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिका होईल. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना रविवारी १० डिसेंबर रोजी डरबनमधील किंग्समीड स्टेडियमवर होणार आहे.
भारताच्या युवा संघासमोर दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. टी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. पण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली नवोदितांच्या संघासाठी विजय मिळवणं आव्हानात्मक असेल.
भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाला टी२० मालिकेत ४-१ अशा फरकाने हरवलं. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण दक्षिण आफ्रिकेत आव्हान वेगळं असेल. दक्षिण आफ्रिकेचा संघही फॉर्ममध्ये असून दोन्ही संघात तुल्यबळ लढत होण्याची अपेक्षा आहे.
सामना किती वाजता?
डरबनमधील किंग्समीड स्टेडियमवर होत असलेला हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडे सात वाजता होईल. तर त्याआधी ७ वाजता नाणेफेक होईल.
थेट प्रसारण
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या टी२० मालिकेचं थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. वेगवेगळ्या भाषांमधून सामन्याचा आनंद लुटता येईल. डीडी फ्री डिश वापरणाऱ्या प्रेक्षकांना डीडी स्पोर्ट्सवर फ्री सामना पाहता येईल.
ऑनलाइन फ्री पाहता येणार
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचं ऑनलाइन प्रक्षेपणही होणार आहे. तुम्हाला हॉटस्टारवर हा सामना मोफत पाहता येईल. मोबाइलवर पाहणाऱ्यांसाठी फ्री असेल तर टीव्ही, लॅपटॉपवर पाहण्यासाठी एपचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज