mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महासत्तेच्या भूमीत दिसली भारताची पॉवर! देशहिताला प्राधान्य देऊनच गुंतवणूक वाढविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2023
in राष्ट्रीय
‘मन की बात’ खास बनवण्यासाठी जय्यत तयारी; विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। 

जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारतात व्यवसायाची क्षमता आणि संधी ही सर्वोत्तम आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे देशहितास प्राधान्य देऊनच गुंतवणूकीस प्रोत्साहन देतात, असे प्रतिपादन ‘टेस्ला’चे सहसंस्थापक आणि उद्योजक इलॉन मस्क यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोहोचले. जॉन एफ केनेडी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी तेथे उपस्थित भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. विमानतळावरून पंतप्रधान हॉटेल लोटे न्यूयॉर्क पॅलेसमध्ये पोहोचले.

येथे त्यांनी टेस्लाचे सहसंस्थापक आणि ट्विटरचे मालक एलोन मस्क यांच्यासह नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान अशा २४ व्यक्तिमत्त्वांची भेट घेतली.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर टेस्लाचे इलॉन मस्क यांनी भारताच्या उद्योगस्नेही धोरणाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, नजिकच्या भविष्यात टेस्ला भारतात गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारतात व्यवसायाची क्षमता आणि संधी ही सर्वोत्तम आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे देशहितास प्राधान्य देतात. त्यांच्या मनात प्रत्येकवेळी देशातील नागरिकांच्या भल्याचा विचार असतो. या विचारास प्राधान्य देऊनच ते गुंतवणूकीस प्रोत्साहन देतात, असे मस्क यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे भारतात यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत टेस्लाच्या कारखान्याविषयी सकारात्मक निर्णय होईल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधानांनी बौद्ध लेखक प्रोफेसर रॉबर्ट थर्मन, निबंधकार-सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रोफेसर नसीम निकोलस तालेब, खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक नील डीग्रास टायसन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर आणि गुंतवणूकदार रे डालिओ यांचीही भेट घेतली.

खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डी ग्रासे टायसन आणि पंतप्रधानांनी युवकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्याबाबत चर्चा केली. भारतीय अंतराळ मोहीम आणि या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवरही चर्चा झाली. बौद्ध लेखक रॉबर्ट थर्मन यांनी पंतप्रधानांशी भारताच्या बौद्ध वारशावर चर्चा केली. यादरम्यान जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बौद्ध धर्माच्या भूमिकेवरही चर्चा करण्यात आली.

शैक्षणिक अभ्यासक प्रा. नसीम निकोलस तालेब यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतातील तरुणांच्या समस्यांवर चर्चा केली. त्यांनी त्यांचे एक पुस्तकही पंतप्रधानांना भेट दिले.

अमेरिकन गुंतवणूकदार आणि लेखक रे डॅलिओ यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. दोघांनी भारतातील गुंतवणूक वाढविण्याबाबतही चर्चा केली. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर यांनी पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत भारतीय शहरांच्या शाश्वत विकासावर भर दिला. तंत्रज्ञानाच्या प्रचाराबाबतही दोघांनी चर्चा केली.

ट्विटरचे माजी मालक जॅक डॉर्सी यांच्या भारतात ट्विटर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या कथित धमकी दिल्याच्या दाव्यास फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, स्थानिक सरकारांचे नियमांचे पालन करण्याशिवाय ट्विटरला पर्याय नाही. जर ट्विटरने स्थानिक सरकारच्या कायद्यांचे पालन केले नाही तर ट्विटरला संबंधित सरकारे बंद करतीलच, असेही मस्क यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

भारत-ऑस्ट्रेलियाचे आजपासून वनडे सामने लाइव्ह कुठे पाहू शकता, स्टार-सोनी नाही तर हे चॅनेल लावा; जाणून घ्या…

September 22, 2023
मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, लोकसभा निवडणूक ‘या’ महिन्यात होणार; विशेष अधिवेशनात ‘वन नेशन-वन इलेक्शन’ विधेयक आणणार?

आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशन सुरु होणार; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? पाच दिवसांसाठी काय आहे सरकारची तयारी?

September 18, 2023
अभिमान! महासत्तेशी ‘पॉवरफुल’ भागीदारी; जेट इंजिनाची निर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये करारांची घोषणा; मोदींची क्रेझ 75 वेळा टाळ्यांचा गडगडाट, सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी रांग

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्हीही देऊ शकता थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा; जाणून घ्या कसं

September 17, 2023
बातमी कामाची! क्रिप्टोकरन्सी बंद होणार? G20 परिषदेत ‘या’ मुद्द्यावर झाले एकमत

बातमी कामाची! क्रिप्टोकरन्सी बंद होणार? G20 परिषदेत ‘या’ मुद्द्यावर झाले एकमत

September 10, 2023
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

मोठी बातमी! एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूचे खेळण्याचे स्वप्न भंगले; टीम इंडियाचे वेळापत्रक पाहा…

September 5, 2023
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

निराशाजनक! भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यात पावसाचा विजय

September 2, 2023
मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, लोकसभा निवडणूक ‘या’ महिन्यात होणार; विशेष अधिवेशनात ‘वन नेशन-वन इलेक्शन’ विधेयक आणणार?

मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, लोकसभा निवडणूक ‘या’ महिन्यात होणार; विशेष अधिवेशनात ‘वन नेशन-वन इलेक्शन’ विधेयक आणणार?

September 1, 2023
अभिमान! गोल्डन बॉयने इतिहास रचला, पाकिस्तानी खेळाडूला हरवून नीरज चोप्रा बनला वर्ल्ड चॅम्पियन; पंतप्रधान मोदींने केले कौतुक

अभिमान! गोल्डन बॉयने इतिहास रचला, पाकिस्तानी खेळाडूला हरवून नीरज चोप्रा बनला वर्ल्ड चॅम्पियन; पंतप्रधान मोदींने केले कौतुक

August 28, 2023
आनंदोत्सव! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश; अखंड भारतासाठी अभिमानाचा क्षण; भारताने इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

आनंदोत्सव! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश; अखंड भारतासाठी अभिमानाचा क्षण; भारताने इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

August 23, 2023
Next Post
खळबळजनक! खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल

खळबळजनक! खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  ‘हे’ आव्हाने

प्रतिज्ञापत्र व रेकॉर्ड या ठिकाणी पाच दिवस वेग वेगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती; खाबगिरीला बसणार आळा; तहसीलदार मदन जाधव यांचा उपक्रम

September 25, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी सासू, नणंद आणि नणंदेचा मुलगा या तिघांवर गुन्हा दाखल

September 25, 2023
अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

September 25, 2023
काळजीवाहू आमदार! शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा; आ.समाधान आवताडे यांचे औषध-खत दुकानदारांना आवाहन

काळजीवाहू आमदार! शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा; आ.समाधान आवताडे यांचे औषध-खत दुकानदारांना आवाहन

September 24, 2023
दूधास एफआरपी लागू करा! गाईच्या दुधास ४०, म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर भाववाढ द्या, मगच आषाढी पूजेला या; मुख्यमंत्र्यांना इशारा

दुधाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयाने कपात; गायीच्या दुधाला ३२ ते ३३ रूपये दर; शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन कोलमडले

September 24, 2023
मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 674 पदांसाठी निघाली बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज करता येणार

अमृत कलश! सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून माती जाणार दिल्लीला; ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ महोत्सवांतर्गत उपक्रम

September 25, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा