mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा; फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 6, 2022
in मनोरंजन
भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा; फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत हा सामना खेळवला गेला.

यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी पाहुण्या श्रीलंकेवर १ डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला आहे आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १७४ धावांवरच गारद झाला. परिणामी भारताने श्रीलंकेला फॉलोवॉन दिला. मात्र श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावातही १७८ धावाच करूच शकला.

असा झाला भारत वि. श्रीलंका सामना
भारत आणि श्रीलंकेतील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी निवडली होती. भारताकडून पहिल्या डावात अष्टपैलू रविंद्र जडेजा याने सर्वाधिक धावा केल्या.

त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २२८ चेंडूत ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १७५ धावा चोपल्या. त्याच्या साथीला अष्टपैलू आर अश्विननेही खालच्या फळीत तुफानी ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली.

तत्पूर्वी डावाच्या सुरुवातीला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने ९६ धावा फटकावल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारीनेही ५८ धावांनी संथ खेळी केली. भारतीय संघाने ५७४ धावांवर डाव घोषित केला.

भारताच्या भल्यामोठ्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला २०० धावाही करता आल्या नाहीत. फिरकी अष्टपैलू जडेजाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दम दाखवत श्रीलंकेला कमी धावांवर रोखले. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

तसेच जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले. या डावात श्रीलंकेकडून एकटा पथुम निसांका अर्धशतक करू शकला. तो ६१ धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे ६५ षटकांमध्ये १७४ धावांवर सर्वबाद झालेल्या श्रीलंकन संघाला भारताने फॉलोअप दिला.

दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने एकाकी झुंज दिली. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. तो दुसऱ्या डावात ८१ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करत नाबाद राहिला.

या डावात भारताकडून फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. हा रोहित शर्माचा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पहिला विजय होता.

यानंतर उभय संघातील दुसरा आणि शेवटचा सामना १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरू येथे होणार आहे.(स्रोत:महा स्पोर्ट्स)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टीम इंडिया

संबंधित बातम्या

काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

जबरदस्त ऑफरचा वर्षाव! शीतल कलेक्शनमध्ये भव्य ‘स्वरनिका साडी महोत्सवाचे आयोजन; दीपावली निमित्ताने कपडे खरेदीवर मिळावा मोत्याचा दागिना मोफत

October 12, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळ! मंगळवेढ्यात मंदिरातील दानपेटी फोडणारा चोर रंगेहात पकडला; भक्त व गावकऱ्यांच्या तत्परतेने चोरीचा प्रयत्न फसला

October 7, 2025
कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या मंडळाकडून यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा; मिरवणुकीसाठी ‘हे’ आकर्षण राहणार

कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या मंडळाकडून यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा; मिरवणुकीसाठी ‘हे’ आकर्षण राहणार

September 23, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

नवरात्र उत्सवात डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईट वापरास सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश

September 22, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

दीदी झाली लखपती! लाडक्या बहिणींना बिनव्याजी ‘इतक्या’ लाखांचे कर्ज देणार; 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गणित

September 18, 2025
मंगळवेढा पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होणारा बालविवाह टळला

खळबळजनक! मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिला; आई-वडिलांसह चौघांवर अडीच वर्षांनंतर गुन्हा

September 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बँक खात्यात ‘इतके’ हजार रुपये जमा होण्यास सुरूवात; बहिणींनो पैसे आले का? असं करा चेक

September 12, 2025
‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

September 14, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन; गौरी गणपती सजावट स्पर्धेचे होणार वितरण

September 7, 2025
Next Post
काळजी घ्या! मंगळवेढ्यात ऊस ताेड कामगाराचा फडात चक्कर येऊन रहस्यमयरित्या मृत्यू

काळजी घ्या! मंगळवेढ्यात ऊस ताेड कामगाराचा फडात चक्कर येऊन रहस्यमयरित्या मृत्यू

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा