टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव हे ठेकेदार प्रेरित काम करत असून त्यांना बडतर्फ करून विभागीय चौकशी लावण्याची मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.
मंगळवेढा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी हटाव, नगरपरिषद बचाव, मुख्याधिकारी एक काम करो .. खुर्ची छोडो आराम करो, ठेकेदार प्रेरित काम करणाऱ्या मुख्याधिकारी यांचा धिक्कार असो, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनात बोलताना युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव म्हणाले, “मंगळवेढा नगरपरिषदेचा टॅकर ठेकेदार गेली 2 वर्षे नगरपरिषदेचे नाव खुडून वैयक्तिक वापर करत होता.
या प्रकरणाची युवा मोर्चाने पोलखोल केली असता दि.25 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता नगरपरिषदेने टँकर आणून परिषदेच्या आवारात लावला.
सदरील टँकरचे ठेकेदारकडून भाडे काढावे व त्याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून दि.27 जानेवारी रोजी युवा मोर्चा कडून मागणी करण्यात आली. त्यानंतर देखील मुख्याधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही.
दि.31 जानेवारी रोजी युवा मोर्चाने नगरपरिषदेच्या आवारात संबळनाद आंदोलन केले, यानंतर मुख्याधिकारी यांनी 3 दिवसात ठेकेदाराला स्वतःचे म्हणणे द्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करू म्हणून नोटीस काढली.
पण त्यानंतर ठेकेदार टँकर स्वतःचा असल्याचे सिद्ध करू शकला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेली 15 दिवस झाले तरी मुख्याधिकारी यांनी कोणतीच कारवाई केले नाही.
उलट या प्रकरणाबद्दल विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरे मुख्याधिकारी यांच्याकडून येतात.
ठेकेदार जनतेची मालमत्ता वापरतो ही बाब युवा मोर्चाने खुलासा केली म्हणून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे पत्र ठेकेदार मुख्याधिकारी यांना देतो आणि मुख्याधिकारी लगेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या नावे नोटीस काढतात.
हा प्रकार म्हणजे ठेकेदार प्रेरित काम करणे असे आहे. जनतेकडून चार टक्के वसुलीने घरपट्टी पाणीपट्टी गोळा केली जाते पण वर्षानुवर्ष नगरपरिषदेची मालमत्ता ठेकेदार खुलेआम वापरतो.
सर्व बाबी समोर आहेत पण तरी देखील मुख्याधिकारी यांचे ठेकेदार प्रेम कोणतीच कारवाई करण्यास धजत नाहीत. ठेकेदारावर कारवाई करू म्हणून मुख्याधिकारी फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप ही भाजपने केला आहे.
हा प्रकार शहराचं वाटोळं करणार आहे, म्हणून या शहराचे भलं होण्यासाठी मुख्याधिकारी यांना बडतर्फ करावे व त्यांच्या वरत विभागीय चौकशी लावण्यात यावी.
मुख्याधिकारी यांची कार्यतत्परता जनतेसाठी, शहरासाठी नसून ठेकेदारासाठी आहे. अशी टीका ही यावेळी करण्यात आली. सदरील मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राठोड यांच्याकडे देण्यात आले.
या आंदोलनात युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे , सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी , युवा मोर्चा शहर सरचिटणीस अजित लेंडवे , बबलू सुतार , उपाध्यक्ष रोहित हिरेमठ , आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज