टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी पुन्हा १७ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
गुरुवार दि.३ सप्टेंबर रोजी २७ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले आहेत. तसेच गुरुवारी १२८ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. १२८ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी १० अहवाल पॉझिटिव्ह तर ११८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा ५, दामाजी नगर -२, ब्रम्हपुरी-१ , रड्डे-१,खुपसंगी-१ येथील आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅब चे ७ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत. सदर नागरिक हे शेलेवाडी-६,मल्लेवाडी-१ येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत ५१९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३३१ रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Increase of 17 crore patients in Mangalvedha taluka; The number of patients reached 519
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज