मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग ।
संतांच्या, शौर्याच्या आणि संस्कृतीच्या पवित्र भूमीत उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता मंगळवेढ्याच्या अभिमानाचे प्रतीक ठरला आहे.

लोकसहभागातून साकारलेला हा पुतळा म्हणजे प्रत्येक मराठासह सर्व समाज बांधवाच्या मनातील स्वाभिमानाची प्रतिमा आहे.

मात्र, रविवारी होऊ घातलेला लोकार्पण सोहळा अचानक तिसऱ्यांदा लांबणीवर पडल्याने शिवभक्तांच्या भावना व्यथित झाल्या. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी ठराव पारित झाला.

बैठकीत सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांनी हात उंचावून हा ठराव मंजूर केला. उपस्थितांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा लोकसहभागातून उभारलेला आहे. तो कोणत्याही राजकीय शक्तीचा नव्हे, तर मराठा समाजाच्या आत्मभानाचा प्रतीक आहे. त्यामुळे या ऐतिहासिक पुतळ्याचे लोकार्पण मराठा समाजासाठी लढणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्तेच व्हावे.”

या ठरावास उपस्थित सर्वानी हात उंचावून एकमताने समर्थन दर्शवले. सकल मराठा समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की, दोन दिवसांत जरांगे-पाटील यांच्याशी संपर्क साधून नवी तारीख जाहीर केली जाईल आणि हा सोहळा छत्रपती शिवराजांच्या गौरवाला साजेशा थाटामाटात पार पडेल.
तरुणांच्या भावनांचा सन्मान झाला पाहिजे. उद्घाटनाची तारीख आणखी जवळ आणण्यासाठी प्रयत्न करू, असे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले.

मराठा महासंघाचे रामभाऊ वाकडे यांनी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्तेच व्हावे, असा निर्णय घेतल्याचे सांगितले.
सिद्धेश्वर आवताडे यांनी बाहेरून कुणी मान्यवर येत नसेल तर तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करावे, तोपर्यंत पुतळा झाकून ठेवावा, असे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










