टीम मंगळवेढा टाईम्स ।
कलाकार आणि रसिक,चाहते यांचेतील महत्वाचा दुवा म्हणजे प्रसार माध्यमे असून यामुळेच सर्व चाहत्यापर्यंत पोहोचता येत असल्याचे प्रतिपादन हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांनी केले.
शहरच्या 23 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन बुधवारी दुपारी 2.00 वा. सोलापूरातील हॉटेल सुर्या इंटरनॅशनल येथे ज्येष्ठ हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
जोशी म्हणाले,मंगळवेढा ही रसिक नगरी आहे.या नगरीमध्ये नाटय चळवळ चांगली रूजली आहे.
मंगळवेढा येथे नाटय परिषद शाखेच्या शुभारंभानिमित्त आलो असता तेथील नागरिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. व रथातून मिरवणूक काढली. हा क्षण मी कधीही विसरणार नाही.
मंगळवेढयाच्या ज्वारीबरोबरच इथला हुरडाही अतिशय चवदार आहे.ज्वारी व हुरडयाप्रमाणे माणसेही गोड आहेत.
कला, क्रीडा,साहित्य,नाटय आदी विभागामध्ये मंगळवेढयाचे अनेकजण चमकले आहेत.व मंगळवेढयाचा नावलौकिक केला आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे.
या भूमीतूनच तब्बल 23 वर्षापासून शहरचा दिवाळी अंक हा दरवर्षी प्रसिध्द होतोय. या गोष्टीचे खरोखरच कौतूक वाटते.
या कार्यक्रमास शहरचे संपादक दिगंबर भगरे, वृत्त संपादक राजेंद्रकुमार जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख यतिराज वाकळे,
नाटय परिषद शाखा मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ.सुभाष कदम, नाटय परिषद राज्य नियामक मंडळाचे सदस्य जी.पी. कुलकर्णी,सोलापूर नाटय परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे,
मंगळवेढा नृत्य परिषदेचे अध्यक्ष लहू ढगे यांचेसह रोहन नंदाने,मयुरेश माणकेश्वर, गौरव शहा,मल्लिकार्जून हिप्परगी, प्रतिक भगरे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज