टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकांच्या भावनेची कदर झाली पाहिजे आपला आवाज कुणासमोर झुकला नाही पाहीजे ही भावना आज जागृत झाली आहे पार्ट टाइम राजकारण करणाऱ्याला मतदार धडा शिकवेल.
पाठखळ ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी मला मिळालेला आशीर्वाद अपुरा ठरला, त्याची भरपाई मतदार देतील याची खात्री आहे, म्हणूनच मी सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व स्विकारले आहे तसेच गावातील अनेक समस्यांचा आढावा घेतला आहे लवकरच मतदारांच्या हीताचा जाहिरनामा तयार करून मी आपल्या समोर येत आहे.
विकासाचे व्हिजन
शासनाच्या सर्व प्रकारच्या विकास योजना प्राधान्य क्रमाने गावात व वाडीवस्तीवर राबविणार. दलित वस्तीच्या विविध योजनांचा फंड त्या त्या भागामध्येच खर्च केला जाईल.
ग्रामपंचायतीचा कर संपूर्ण व नियमित भरणाऱ्या कुटूंबास शुध्द पाणी व दळण मोफत देणार. गावातील माजी सैनिकांना ग्रामपंचायतीचे सर्व कर माफ करणार.
अपंग कल्याण योजना अंतर्गत स्वतंत्र निधी मिळवून अपंगासाठीच प्राधान्य क्रमाने खर्च कराणार व अपंगासाठी ग्रामपंचायतीचे सर्व कर माफ करणार.
ग्रामीण ग्रंथालय योजने अंतर्गत दैनिक वृत्तपत्रे तसेच स्पर्धा परिक्षेसाठी सुसज्य ग्रंथालय स्थापन करणार.गावातील व वाडीवस्तीवरील खेळाडूंना व कुस्तीगीरांना सुसज्ज क्रिडांगणाची सुविधा देणार.
वाडीवस्तीवरील रस्ते व अन्य मुलभूत सुविधा विज, पाणी, रस्ते पुरविले जातील. ग्रामपंचायतीच्या जनसुविधा अंतर्गत रस्ते, गटारी, पाणी पाणी पुरवठा यांचे नियोजन करुन योग्य अंमल बजावणी करणार.
संपुर्ण ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत आरोग्य, शिक्षण व निर्मल गांव यासाठी अभियान राबविणार. राष्ट्रीय पेय जल योजने अंतर्गत लघु नळ योजना महात्मा फुले जल अभियान अदिवासी विहीर बंद पाणी पुरवठा व दलित वस्ती पाणी योजना तसेच जलयुक्त शिवार या योजना प्राधान्य क्रमाणे राबविणार.
पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजने अंतर्गत वृक्षारोपन, सौरदिवे, ग्रामीण उर्जा तसेच बायोगॅस या योजना राबविणार.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, तसेच अपंग व वृध्दापकाळ निवृत्ती वेतन या योजना प्राधान्याने राबविणार.
कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रसुतिकालीन अर्थसहाय्य व विधवा निवृत्ती वेतन योजना राबविणार. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजने अंतर्गत गाव व वाडीवस्तीवर विद्युत योजनेचा लाभ देणार. गावातील ग्रामदैवत व देव देवतांची मंदिरे यांची देखभाल दुरुस्ती करणार.
गावचा विकास करण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो
पाठखळ गावच्या राजकारणात अनेक वर्षे पद भोगून देखील गावातील लोकांना पायाभूत सोयी व गरजासाठी न्याय मिळत नसेल तर अशा प्रवृत्तीला बाजूला ठेवणे आवश्यक आसून मतदाराचा स्वाभिमान गहाण पडू न देण्यासाठी आणि माझ्या गावचा विकास करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.
ग्रामपंचायत ही कुणाची जाहागिरी नसून दरवर्षी खणपट्टी पाणीपट्टी भरणाऱ्या गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सोयीसुविधा पुरविणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे,गावचा विकास करण्यासाठी मी कटीबध्द असून मतदार राजा चानाक्ष आहे.
सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर तो मतदार असून त्यांच्या विचाराला मी बांधील आहे, ही लढाई सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी लढतो आहे मला सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे. – आनंद उर्फ बाळासाहेब ज्ञानोबा ताड, सरपंच पदाचे उमेदवार, पाटखळ
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज