टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातून एकमेव पात्र झालेल्या मंगळवेढा नगरपालिकेचा कचरा मुक्त शहर म्हणून नगराध्यक्षा अरुणा माळी यांचा नवी दिल्लीत गौरव करण्यात आला.
राज्यातील ६९ नगरपालिकेचा यावेळी गौरव करण्यात आला. मंगळवेढा नगरपालिकेला ३३ वे स्थान मिळाले हा पुरस्कार केंद्रीय नागरी सचिव दुर्गाशंकर मिश्रा,
केंद्रीय स्वच्छता अभियान संचालक रूपा मिश्रा यांच्या हस्ते नगराध्यक्ष अरुणा माळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव सोमनाथ माळी यांनी स्वीकारला.
नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये १९ वा तर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये राज्यात कचरा मुक्त शहर म्हणून ४१ वा क्रमांक मिळाल्यामुळे नगरपरिषदेचा नावलौकीक राज्यात झाला.
मंगळवेढा शहरामध्ये २१ सार्वजनिक शौचालय असून २३४७ वैयक्तिक शौचालय आहेत.
त्यामधील काही लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळवून दिले आहे. शौचालयाचे दररोज स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते.
औषध फवारणी केल्यामुळे डासांचे प्रमाण रोखण्यास मदत झाली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रक्रिया पालिकेने राबवली.
ओल्या कचऱ्याचे तुकडे करून निर्मिती केलेले खत माफक दरात शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध केले.
सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे आयुष्य जादा असल्यामुळे जमिनीचे नुकसान होते म्हणून प्लास्टिक वेगळे करून त्याचे गट्टे बांधले जातात.
ते औरंगाबाद व सांगली येथील कंपनीला पुढील प्रक्रियेसाठी विक्री केली जाते. या कचऱ्यापासून पालिकेला अल्पशे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील चार वर्षांमध्ये राज्यातील सत्ता आणि नगरपालिका सत्ता परस्परविरोधी असताना देखील प्राप्त निधीतून शहराच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.
माझ्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा संधी मिळाली
शहरांतील नागरीक, विविध मंडळ , संस्था यांचे सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांत सातत्य राखल्यामुळे विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी मिळाला.
नियोजनबध्द केलेले कामकाज व कर्मचा यांनी घेतलेले परिश्रम , सर्व नगरसेवकांचे सहकार्य यामुळेच सदरचा मान सन्मान व रोख स्वरुपाच्या बक्षीसामधून शहरांतील स्वच्छतेची कामे व नागरीकांना चांगल्या सुविधा देण्यास मदत झाली.
पालिकेचा दिल्लीत नावलौकिक करण्याची दुसऱ्यांदा संधी माझ्या कारकिर्दीत मिळाली. – अरुणा माळी, नगराध्यक्ष मंगळवेढा
———————–
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज