टीम मंगळवेढा टाईम्स।
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे वार्षिक अंदाजपत्रक आराखडयाच्या ग्रामसभेत अडथळा आणून 31 वर्षीय महिला अध्यक्षाचा हात पकडून
हातातील प्रोसीडींग रजिस्टर जबरदस्तीने ओढून घेवून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी पांडुरंग चौगुले,समाधान उर्फ संभाजी दादा हेंबाडे, तुकाराम उर्फ दाजी ईश्वर चौगुले, यशवंत ज्ञानोबा आकळे,
दर्लिंग नारायण क्षीरसागर,प्रमोद मारुती जाधव, मधुकर राजाराम मोरे, गजेंद्र सोनवणे, नवनाथ उत्तम साखरे, अस्लम मुजावर, सचिन ढेंबरे (सर्व रा.डोंगरगांव) या 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.26 रोजी 12.30 वा. डोंगरगांव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची आराखडा ग्रामसभा होती.
या सभेच्या अध्यक्ष फिर्यादी होत्या.ग्रामसभा शांततेत व सुरळीत पडावी यासाठी पोलिस ठाण्यास निवेदन दिले होते. यावेळी पंचबेबी जनता परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे सर्व सदस्य तसेच सत्ताधार्याच्या तथा फिर्यादी यांच्या विरोधातील पॅनलचे सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्रामसभा रजिस्टरवर सह्या करीत असताना आरोपीनी मोठमोठयाने बोलून गोंधळ करीत असताना फिर्यादीने शांततेचे आवाहन केले. मात्र आरोपीनी त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले. यावेळी उपस्थित पोलिसांनी सभेचे चित्रीकरणही केले.
या दरम्यान काहीजण दारू पिलेले तर काहीजण अर्वाच्य भाषा सभेत वापरत होते. सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण झाल्यावर सभा पूर्ण झाली.
ग्रामसेवक सुशांत कसबे हे अजेडयावरील विषय वाचन करताना लोकांनी मोठयमोठयाने कालवा करून सभेचे कामकाज बंद पाडले.त्यामुळे ग्रामसभा तहकूब घेण्याचा निर्णय घेतला.
यावेळी वरील आरोपीने फिर्यादी तथा अध्यक्षाचा हात पकडून हातातील प्रोसिडींग रजिस्टर जबरदस्तीने ओढून घेवून महिला अध्यक्षाशी उध्दट वागून सर्वादेखत मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज