टीम मंगळवेढा टाईम्स ।
कर्नाटक राज्यात यल्लम्मा देवीच्या यात्रेला गेल्याचे पाहून चोरटयांनी घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले ३ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रकार मंगळवेढा शहरात घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, भरलोकवस्तीत ही चोरी झाल्याने नागरिकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सचिन चेळेकर हे व्यापारी असून शहरातील मध्यवस्तीत रहावयास आहेत. ते त्यांची पत्नी मनिषा मुलगी अमृता, मुलगा कन्हैय्या यांना घेवून दि.१८ रोजी सकाळी ८.३० वा. ते कोकटनूर (ता. अथणी जि.बेळगाव) येथील यल्लाम्मा देवीच्या यात्रेला गेले होते.
यात्रा करून हे कुटुंबिय दि.२१ च्या सायंकाळी ५.१५ वा. घरी आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तुटून दरवाजा उघडा दिसला. हे दृष्य पाहून पत्नी मनिषा हिने आरडाओरडा केल्याने फिर्यादीने घरात जावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते.
तसेच खोलीतील लोखंडी कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने, १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ४ पिळयाच्या १ तोळा वजनाच्या अंगठया, ४० हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे गंठण, ३० हजार रुपये किमतीचे २ तोळा वजनाचे लक्ष्मीहार,
२० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे झुबे व स्टॉप्स असा एकूण ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वाघमोडे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज