टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला.
अवताडेंनी भालकेंचा शेवटच्या फेरीत 3 हजार 733 मतांनी भालके यांचा पराभव केला आहे. पराभावानंतर भगीरथ भालकेंनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना आपण पराभूत झालो तरी संपलो नसल्याचं म्हटलं आहे.
निसटत्या मताने पराभव झाला असला तरी सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात केली असून जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त 15 हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास भगीरथ भालकेंनी व्यक्त केला.
सर्व शक्ती एकत्र येऊन आपल्या विरोधात लढल्या असल्या तरी मतदारसंघातील जनतेने गेल्यावेळी पेक्षा 15 हजार मतांची वाढ झाली आहे.
आपले वडील देखील 2004 साली पहिल्यांदा पराभूत झाले होते. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर 3 वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिली असल्याचं भालके म्हणाले.
आ.आवताडे आज सकाळपासून कामाला सुरूवात
दरम्यान, आमदार झाल्यावर समाधान अवताडेंनी आज सकाळपासून कामाला सुरूवात केल्याचं पाहायला मिळालं. काल जरी आमदार झालो असलो तरी आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नसून कोरोनाचे संकट वाढत चालल्याने पहिल्यांदा त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळीपासून कामाला सुरुवात केल्याचं अवताडे म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज