टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे शहरात नवे पाच रुग्ण आढळून आल्याचे रविवारी स्पष्ट झाले. यामुळे शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची एकूण संख्या २४ झाली आहे.
ग्रामीण भागात नवे दोन रुग्ण आढळून आले. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका क्षेत्रात शनिवारी एकूण २२९ कोरोना चाचण्या झाल्या.
यातून पाच रुग्ण आढळून आले. शहरात यापूर्वी १९ रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांच्या संपर्कातील २० जणांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात शनिवारी एकूण ८८ कोरोना चाचण्या झाल्या, यातून दोन रुग्ण आढळून आले. ग्रामीणमध्ये एकूण आठ सक्रिय रुग्ण आहेत.
यात बार्शी तालुक्यातील १, माळशिरस १, मंगळवेढा ३, पंढरपूर १ आणि सांगोला तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. ६९ जण होम क्वारंटाइन आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची एकूण संख्या रविवारअखेर १ लाख ८६ हजार ८८ झाली. यापैकी १ लाख ८२ हजार ३५४ जण बरे झाले. मृतांची एकूण संख्या ३,७२६ आहे.
शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या रविवारअखेर ३३ हजार ६९४ झाली . यापैकी ३२ हजार १६५ जण बरे झाले. मृतांची एकूण संख्या १ हजार रुपये५०५ आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज