टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा दुय्यम निबंधक कार्यालयात खोटा कबुली जबाब दिल्याप्रकरणी दस्त लेखनीक विजयकुमार नामदेव घाडगे (रा.मंगळवेढा), मृत्यूपत्र लाभार्थी मारुती शेणवे (रा.तळसंगी), साक्षीदार हरीदास चौगुले (रा.गुंजेगांव), शहाजी नामदेव लिगाडे (रा.कडलास ता.सांगोला) या चौघाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी तथा दुय्यम निबंधक शंकर अनंतराव सांगळे (वय ५६) हे दि.३ जून २०१९ पासून मंगळवेढा येथे कार्यरत आहेत.
श्रीमती प्रभावती एकनाथ शिंदे यांनी दि.१४ जून २०२१ रोजी निष्पादित केलेले मृत्यूपत्र दस्त आरोपी दत्तात्रय शेणवे यांनी दि. २५ जानेवारी २०२२ रोजी या कार्यालयात सादर केल्याने त्याची नोंद दस्त क्र. ४३९/२०२२ प्रमाणे करण्यात आली.
सदर आरोपीने २५ जानेवारी २०२२ रोजी सादर केलेल्या मृत्यूपत्र दस्तातील पान क्र . ७ वर श्रीमती प्रभावती एकनाथ शिंदे यांचे नावे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मरवडे येथे मुदतठेव पावती क्र .८२६४५० व ०८५ ९ ३०१ असे नमुद केले आहे.
मात्र त्यामध्ये मुदतठेव पावतीचा दिनांक नमुद केलेला नाही. परिणामी सदरच्या मुदतठेव पावत्या ह्या कोणत्या तारखेस केलेल्या आहेत याचा बोध होत नाही.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचेशी पत्रव्यवहार केला असता बँकेने त्या अनुशंगाने
दि.२८/६/२०२१ रोजी एक लाख ( पावती क्र . ०८५३३०१ ) खाते नं . ११८२ तसेच २८/६/२०२१ रोजी एक लाख रु . पावती क्रमांक ०८२६४५० अशा दोन मुदतठेव पावत्या केलेल्या असून सदर बाबत बँकेमध्ये अॅडव्हॉन्स बुकींगची सुविधा उपलब्ध नाही.
सदर दोन मुदत ठेवीच्या पावत्या ह्या २८/६/२०२१ रोजी केलेल्या आहेत. बँकेचा अहवाल व मृत्यूपत्रातील मुदतठेव पावतीचे क्रमांक यात विसंगती दिसून येते.
त्यामुळे वरील मृत्यूपत्र तयार करणारा आरोपी विजयकुमार घाडगे, मृत्यूपत्र लाभार्थी दत्तात्रय शेणवे, साक्षीदार हरीदास चौगुले, शहाजी लिगाडे यांनी संगनमताने फिर्यादी तथा दुय्यम निबंधक शंकर सांगळे यांच्यापुढे दि.२५ जानेवारी रोजी १६ ते १७ च्या दरम्यान खोटा कबुली जबाब देवून भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज