टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील एका मॅचिंग सेंटरमध्ये कपडे खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळयातील तुटलेले 1 लाख रुपये किमतीचे 18 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र
काऊंटरवर ठेवताच हातोहात चलाखीने पळविणार्या उज्वला जयवंत काळे(वय 31), वैशाली जनार्धन काळे (वय 25 रा.खडकी) या दोघींना 24 तासात शोध घेवून पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी वैशाली बिरूदेव लवटे (वय 28 रा.नंदेश्वर) ह्या त्यांच्या नातेवाईकासह शहरातील एका मॅचिंग सेंटरमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी दि.25 रोजी दुपारी 3.15 वा. गेले होते.
या दरम्यान फिर्यादी महिलेच्या कडेवर असलेल्या लहान मुलाने रडण्याच्या ओघात फिर्यादीच्या गळयातील गंठण ओढल्याने ते तुटले होते.दरम्यान हे गंठण फिर्यादीने काऊंटवर इतर साहित्यासोबत ठेवले होते.
यावेळी वरील महिला आरोपीनी फिर्यादीची नजर चुकवून हातचलाखीने काऊंटवरील एक लाखाचे गंठण चोरून नेले होते. ही घटना फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी दोन अनोळखी महिलाविरूध्द गुन्हा दाखल केला होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी पोलिसांची टिम तयार करून तांत्रिक पध्दतीने सी.सी.टि.व्ही. कॅमेराच्या माध्यमातून शोध घेण्यात त्यांना यश मिळाले.
तपासिक अंमलदार पोलिस नाईक कृष्णात जाधव, महिला पोलिस हवालदार सुनिता चवरे, वंदना अहिरे, महेश कोळी, प्रमोद मोरे, सुनिल गायकवाड या टिमने खडकी येथे जावून वरील आरोपींना ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला हजर केले.
पोलिसांनी त्या दोन महिलांना अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
या दरम्यान, तपासिक अंमलदाराने त्या दोन महिला आरोपीकडून 1 लाख रुपये किमतीचे 18 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र जप्त केले. पोलिसांनी घटना घडल्यापासून 24 तासाच्या आत महिला आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून यापुढेही पोलिसांनी अशीच कामगिरी करावी अशी नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज