मंगळवेढा टाईम्स न्युज।
सील केलेले गाळे पुनःश्च ताब्यात देण्याबाबतची कृषी उत्पन्न बाजार समितीविरुद्धची याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली.

मंगळवेढा कृषी उत्पन्न समितीचे पंढरपूर रस्त्यालगत गाळे असून यातील काही गाळेधारकांनी बाजार समिती नियमानुसार पूर्तता न केल्याने गाळे सील करण्यात आले.

त्याविरोधात गोपीनाथ रामचंद्र माळी, अजय ज्ञानेश्वर गवळी, विजय राजाराम खडतरे, रामचंद्र काशीनाथ गवळी, कबिर भिवा शेवडे, शशिकांत हरिदास हेंबाडे व सिद्धेश्वर गुराप्पा माळी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीविरुद्ध याचिका केली.

सील केलेले गाळे पुनःश्च ताब्यात देण्याबाबत आदेश द्यावेत अशी याचिका दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीकडून योग्य व रितसर माहिती न्यायालयासमोर सादर केली.

गाळेधारकांची याचिका फेटाळण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विधिज्ञ म्हणून ॲड. इरफान महिबूब सय्यद,

ॲड. प्रतिक बसवेश्वर बुरकूल व कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा यांच्यावतीने सचिव सचिन मानसिंग देशमुख व निरिक्षक दत्तात्रय कांबळे यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















