mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शब्द पाळला! पंढरपूर एमआयडीसीचे लवकरच भूमिपूजन, कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित; आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांचे यश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 22, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
शब्द पाळला! पंढरपूर एमआयडीसीचे लवकरच भूमिपूजन, कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित; आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांचे यश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एम आय डी सीच्या उभारणीला आता गती येणार आहे. लवकरच एमआयडीसीचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, चार प्रमुख वाऱ्या वर उदरनिर्वाह करणारे गाव अशीही पंढरपूरची ओळख आहे. पंढरपूर तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या शोधत पुण्या मुंबईला जातात.

स्थानिक पातळीवर एम आय डी सी असावी अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र आजवर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी एम आय डी सी मंजूर झाली नाही.

बऱ्याच वेळी स्थानिक राजकारणाच्या कुरघोडी मुळे एम आय डी सी उभारणीत खोडा घातला जात होता. परंतु आ. समाधान आवताडे यांनी गेल्या केवळ दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून, कासेगाव हद्दीत एम आय डी सी मंजूर करून घेतली.

आणि दि.२१ ऑगस्ट पासून कासेगाव हद्दीतील गट नंबर १९४७/४, १९४७/६, १९४७/ ८ मधील हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून उद्योग मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच पंढरपूर एम आय डी सी उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

येथील औद्योगिक वसाहतीच्या उभरणीतील महत्वाचा टप्पा पार झाला आहे. आ.समाधान आवताडे यांनी मागील दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे.

कासेगाव हद्दीतील जागेचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळास पाठवला होता.औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली होती. त्यानंतर आ.आवताडे यांनी उद्योग मंत्रालय, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता.

अखेर दि.२१ रोजी उद्योग मंत्रालयाकडून राज्यपालांच्या आदेशानुसार ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. आ. आवताडे यांनी उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संजय देगावकर यांच्याकडून हा अध्यादेश स्वीकारला आहे. त्यानंतर आवताडे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले आहेत.

पंढरपूर येथील एम आय डी सी. च्या उभरणीतील कासेगाव हद्दीतील जागा निश्चित केल्यामुळे पंढरपूर  तालुक्यातील हजारो बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या औद्योगिक विकासाला ही चालना मिळणार आहे.

पंढरपूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयांसह चांगल्या उच्च शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे. भीमा नदी मुळे एम आय डी सी करिता पाणी उपलब्ध आहे.

शिवाय पंढरपूर शहर आणि तालुक्यात आता पक्क्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. शिवाय रेल्वे सेवा पंढरपूर पर्यंत चालू आहे. त्यामुळे दर्शन एम आय डी सी उभारण्यासाठी पोषक परिस्थिती पंढरपूर मध्ये आहे, मात्र आजवरच्या  राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.

आता लवकरच भूमिपूजन करू

पंढरपूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून मी सार्वजनिक काम करतोय, या दरम्यान हजारो युवकांनी एम आय डी सी ची गरज बोलून दाखवली. आणि मलाही याची गरज जाणवत होती. सुदैवाने पोटनिवडणुकीत जनतेने आमदार केले..त्यानंतर एम आय डी सी चां विषय मी प्राधान्याने हाती घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री ना.उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सहकार्यामुळे लवकरात लवकर हा विषय मार्गी लावता आला याचे समाधान आहे.  जागा निश्चित झाली आहे आता लवकरच भूमिपूजन करू- आ.समाधान आवताडे

पंढरपूरच्या उद्योगाच्या विकासाला संधी मिळेल, रोजगार वाढेल

पंढरपूर शहर आणि तालुक्यात कुशल मनुष्यबळ, चांगली रस्ते कनेक्टीव्हीटी, रेल्वे सेवा, मुबलक पाणी, साखर कारखानदारी, फळ शेती असल्याने उद्योगासाठी पोषक वातावरण आहे..मात्र एम आय डी सी अभावी हजारो युवकांना रोजगार शोधत बाहेर जावे लागत होते. अनेकांना जागेअभावी उद्योग उभा करता आले नाहीत, काही उद्योजक तालुक्या बाहेर निघून गेले. मात्र आता एम आय डी सी मंजूर झाल्याने पंढरपूरच्या उद्योगाच्या विकासाला संधी मिळेल, रोजगार वाढेल- बाळकृष्ण सूर्यवंशी, उद्योजक अनवली, पंढरपूर

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शब्द पाळला

संबंधित बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची बदली; त्यांच्या जागी तहसीलदार प्रदीप शेलार यांची नियुक्ती

July 1, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळणार, भक्तांसाठी विठूराया २४ तास उभा राहणार; ‘या’ तारखेपर्यंत असणार दिवसभर दर्शन उपलब्ध

June 29, 2025
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

June 29, 2025

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Next Post
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

धक्कादायक वस्तव्य! 'आमच्या एरियात हैवान राहतोय हे माहीतच नव्हतं.', शेजारी संतापले; अक्षयचे कारनामे आले बाहेर

ताज्या बातम्या

खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची बदली; त्यांच्या जागी तहसीलदार प्रदीप शेलार यांची नियुक्ती

July 1, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

July 1, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा