टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झालेली असताना कुठल्या नियमाच्या आधारे त्यांना नेमणूक आदेश दिला तसेच पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मंगळवेढ्यात नेमणूक केल्याच्या विरोधात
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आज दि.१२ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी एक वर्षांपूर्वी चार्ज घेतल्यापासून अनेक तक्रारीमुळे वादग्रस्त ठरल्याने मंगळवेढ्याचे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक यांच्या
कार्यालयासमोर आंदोलन केल्यामुळे त्यांची दोन महिन्यापूर्वी पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केली होती
निंबोणी येथील कामू पाटील यांचा खून झालेला असताना मारेकऱ्यांवरती ३०२ च्या कलमानवये गुन्हा दाखल न केल्यामुळे आर्थिक व्यवहार करून ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माने यांच्या विरोधात मुंबई आझाद मैदान येथे
विविध आंदोलने चालू असताना सुद्धा व कोर्टात एकाची याचिका दाखल केलेली असताना सुद्धा अशा परिस्थितीत सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे यांनी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही विचार न करता त्यांची नेमणूक केलेली ही बेकायदेशीर असून यामुळे पोलीस खातं बदनाम होत आहे
व या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोलापूरचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांची बदली व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची नेमणूक रद्द करण्याच्या व त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी ओबीसीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील, जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, उत्तम सरडे, जिल्हा उपाध्यक्ष निसार पाटील, मंगळवेढा तालुका संपर्कप्रमुख नाना बिचुकले, दादासाहेब भगरे, अन्य ग्रस्त कुटुंबातील रवींद्र पाटील, अण्णा आसबे, मारुती बोरखडे, सुधाकर कांबळे उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज